चिअर्श ! ‘या’ राज्यात महिलांसाठी दारूची वेगळी दुकानं

भोपाळ : वृत्तसंस्था – मध्य प्रदेश सरकारने महिलांसाठी दारूची वेगळी दुकानं सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही अडचणींशिवाय महिलांना दारू खरेदी करताव यावी हा कमलनाथ सरकाराचा प्रयत्न आहे. सुरुवातीला भोपाळ, इंदूर, जबलपूर आणि ग्वाल्हेरमध्ये एक-एक दुकान सुरु करण्यात येणार आहेत. या दुकानांमध्ये महिलांना आवडणारे वाईन्स आणि व्हिस्कीचे सर्व ब्रँड्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

दिल्ली, मुंबई आणि इतर मेट्रो सिटींच्या धरतीवर ही दुकानं सुरु करण्यात येणार आहेत. दर्जा उत्तम राहावा यासाठी दारूची फक्त विदेशी ब्रँड्स दुनामाध्ये विक्रीसाठी ठेवली जाणार आहेत. राज्यात नोंदणी नसलेल्या दारुची देखील या दुकानात विक्री करण्यात येणार आहे. तसेच या दुकानात विकण्यात येणाऱ्या विदेशी दारूनवर अतिरिक्त कर लावण्यात येणार नाही. कारण आयात करतानाच त्यांच्यावर कर आकला जातो. त्यामुळे राज्यात महागड्या दारुचा व्यवसाय वाढेल अशी माहिती अधिकाऱ्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिली आहे.

ही दुकानं मॉल्स किंवा इतर ठिकाणी सुरु करण्यात येणार आहे. अशा ठिकाणी महिलांना दारू खरेदी करणं अधिक सोयीचं होणार आहे. महिलांसाठी दारूची दुकानं सुरु केल्यामुळे राज्याच्या महसूली उत्पन्नात वाढ होणार आहे. तसेच स्थानिक ब्रँड्सना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार राज्यातील भोपाळ, इंदूर, ग्वाल्हेर आणि जबलपूरमध्ये वाईन फेस्टीव्हलचे आयोजन करणार आहे. स्थानिक व्यापाऱ्यांनी ही मागणी अनेक दिवसांपासून लावून धरली होती, अशी माहिती व्यावसायिक कर विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आय.सी.पी.केशरी यांनी दिली.