Kamla Nehru Hospital-Pune PMC | कमला नेहरू येथील डायलिसिस सुविधेसाठी निविदा ! डायलिसिस सुविधा सुरू होण्यासाठी आणखी महिना लागण्याची शक्यता

महापालिका प्रशासनाने यापूर्वीच्या संस्थेसोबतचा करार रद्द केला होता रद्द

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Kamla Nehru Hospital-Pune PMC | शहरातील गरीब रुग्णांसाठी आधार असलेल्या कमला नेहरू रुग्णालयात डायलिसिस सुविधा सुरू करण्यासाठी नवीन निविदा काढण्यात आली आहे. येत्या एक महिन्याच्या आत कमला नेहरू रुग्णालयात पुन्हा डायलिसिसची सुविधा सुरू होईल, असे महापालिका प्रशासनाने सांगितले.

शहरातील मध्यवर्ती भागात असलेले कमला नेहरू रुग्णालय हे महापालिकेचे सर्वात मोठे रुग्णालय आहे. शहरातील गरिबांसाठी हे रुग्णालय उपचारासाठी आधार बनले आहे. सर्वसामान्य कुटुंबांना तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना कमी खर्चात डायलिसिसची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रशासनाने एका संस्थेशी करार करून येथे डायलिसिस सुविधा सुरू केली होती. मात्र, या सुविधेत वारंवार अडथळा येत असल्याने आणि मशीन बंद पडण्याच्या घटनांमुळे महापालिकेने संबंधित संस्थेसोबत केलेला करार रद्द केला होता. तसेच येत्या एक महिन्यात ही सुविधा सुरू करण्याचा दावा प्रशासनाने केला होता. २०१५ मध्ये डायलिसिस केंद्र सुरू करण्यात आले.महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये डायलिसिस उपचार घेणार्‍या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्या तुलनेत उपचार देणार्‍या डायलिसिस मशीनची संख्या खूपच कमी आहे. महापालिकेच्या रुग्णालयातील डायलिसिस सुविधा पीपीपी तत्त्वावर चालविल्या जातात. शहरातील महापालिकेच्या ८ डायलिसिस सेंटरमध्ये सुमारे ६७ मशीन कार्यरत आहेत.

डायलिसिसचा खर्च महाग आहे. यामुळे हा खर्च शहरी गरीब योजनेतून रुग्णांना दिला जातो.
परंतु, वाढत्या खर्चामुळे महापालिकेने २०१५ मध्ये कमला नेहरू रुग्णालयात पहिले डायलिसिस केंद्र सुरू केले.
केंद्र बंद असल्याने बाधितांची गैरसोय होत आहे.
महापालिकेचे पहिले डायलिसिस सेंटर आठ वर्षांपूर्वी कमला नेहरू येथे सुरू झाले.
दहा वर्षे ते चालवण्याचे टेंडर एका खासगी संस्थेला दिले होते. रुग्णालयात एकूण १५ मशीन होत्या.
परंतु, गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णालयातील मशिन बंद आहेत.
त्यामुळे अनेक नागरिक व किडनीच्या आजाराने ग्रस्त रुग्णांची गैरसोय होत होती.
संस्थेच्या हलगर्जीपणाच्या अहवालानंतर महापालिकेने संस्थेसोबतचा करार रद्द केला आहे.
मात्र, आता महापालिकेच्या आरोग्य विभागाने डायलिसिस सेंटरसाठी नव्याने निविदा काढली आहे. येत्या एक महिन्यात सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हॉस्पिटलमध्ये डायलिसिस उपचार उपलब्ध करून दिले जातील, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये डायलिसिस उपचारासंबंधीची निविदा काढण्यात आली आहे. यामध्ये रुग्णालयात सुरू करण्यात येणार्‍या डायलिसिस सेंटरची सर्व मशिन्स, फर्निचर व उपचाराचे साहित्य संबंधित कंपनीला आणावे लागणार आहे. येत्या एक महिन्यात सर्व प्रक्रिया पूर्ण होईल. डायलिसिसची सुविधा लवकरात लवकर सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

डॉ.संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका.
(Dr Sanjeev Vavre)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC News | भोगवटा पत्र मिळताच नवीन मिळकत येणार ‘करा’च्या कक्षेत ! बांधकाम विभाग, महावितरण आणि पाणी पुरवठा विभागाची माहितीही होणार शेअर

पुणे: गुन्हे शाखेकडून राजधानी दिल्लीत छापेमारी, 400 किलो ‘एमडी’ जप्त; पुणे पोलिसांकडून तब्बल 2200 कोटी रुपयांचे 1100 किलो एमडी (MD) जप्त (Videos)

Pune PMC News | …तोपर्यंत देवाची उरूळी येथील बायोमायनिंगचे काम सुरू करा – महापालिका आयुक्त विक्रम कुमार