Kamlakar Nadkarni Passed Away | ज्येष्ठ नाट्य समीक्षक आणि लेखक कमलाकर नाडकर्णी यांचं निधन

पोलीसनामा ऑनलाईन टीम : कलाविश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी (Kamlakar Nadkarni Passed Away) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मागच्या 50 वर्षांपासून ते नाट्य समीक्षा लिहित होते. नाट्य समीक्षा लिहिण्यात त्यांचा हात कुणीही धरू शकत नाही. त्यांनी आत्तापर्यंत शेकडो नाटकांची समीक्षा केली आहे. मागच्या दोन ते तीन महिन्यांपासून ते आजारी होते. त्यांच्या माघारी पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. आज दुपारी 12 वाजता त्यांच्या राहत्या घरातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर ओशिवरा येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. (Kamlakar Nadkarni Passed Away)

कमलाकर नाडकर्णी यांची कारकीर्द

कमलाकर नाडकर्णी यांनी ‘लोकप्रभा’ या साप्ताहिकातून नाट्य समीक्षा लिहिण्यास सुरुवात केली होती. त्यांनी आपल्या कारकिर्दीत ‘महानगरी नाटक’, ‘राजा छत्रपती’ हे बालनाट्य, ‘नाटकी नाटक’ ही पुस्तके लिहिली आहेत. कमलाकर नाडकर्णी यांनी सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये सुधा करमकर यांच्या बालनाट्य संस्थेत लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार म्हणून काम केले होते. कमलाकर नाडकर्णी हे उत्तम नाट्य समीक्षक असले तरी लेखक, नाट्य दिग्दर्शक आणि अभिनेता अशा सर्वच भूमिका ते जगले होते. ((Kamlakar Nadkarni Passed Away)

नाडकर्णी यांनी सुधा करमरकर यांच्या ‘लिटल थिएटर’ या संस्थेच्या ‘बजरबट्टू’, ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘चिनी बदाम’ आदी बालनाट्यात काम केले आहे. ‘बहुरूपी’ या प्रायोगिक नाट्यसंस्थेच्या ‘जुलूस’ या नाटकातही त्यांनी काम केले होते.याच नाट्यसंस्थेसाठी राज्य नाट्यस्पर्धेसाठी त्यांनी काही इंग्रजी नाटकांचा मराठीत अनुवाद केला होता.नाडकर्णी यांनी ‘जाणता राजा’ या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कार्यक्रमावर ‘द ग्रेट बाबासाहेब सर्कस’ या मथळ्याखाली पुरंदरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यांच्या या टीकेची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. अशा या हरहुन्नरी व्यक्तीच्या जाण्याने सर्व स्थरातून दुःख व्यक्त केले जात आहे.

Web Title :  Kamlakar Nadkarni Passed Away | veteran critic kamlakar nadkarni passed away

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Cyber Crime News | माजी खासदार निलेश राणे यांना अपमानास्पद शिवीगाळ, बदनामी केल्याचा प्रकार; सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल

Jalna Accident News | लेकीला भेटण्यासाठी घरातून निघालेल्या वृद्ध पती-पत्नींचा अपघातात मृत्यू; मुलीची भेट राहिली अपूर्ण

Ridhima Pandit | छोट्या पडद्यावरील ‘या’ अभिनेत्रीने वयाच्या 32 व्या वर्षी गोठवले बीजांड; पोस्ट शेअर करत दिली माहिती