कमलेश तिवारी मर्डरकेस ! आरोपी मौलाना अनवारूल हक आणि मुफ्ती नईमला अटक, शीर छाटण्यासाठी ठेवलं होतं 51 लाखाचं बक्षिस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हिंदू महासभेचे कमलेश तिवारी यांची 18 ऑक्टोबर रोजी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात आता गुजरातच्या एटीएस पोलिसांनी दोन मौलानांना अटक केली असून मौलाना अनवारुल हक आणि मुफ्ती नईम कासमी अशी त्यांची नावे आहेत. यांमधील अनवारुल हक याने तिवारी यांचे शीर कलम करण्यासाठी 51 लाखांची घोषणा केली होती. त्याला नगिनाच्या आशियाना कॉलनीमधून अटक करण्यात आली आहे. सध्या त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

Kamlesh Tiwari murder case- accused Maulana Anwarul Haq arrested from Bijnor

मौलाना मुफ्ती नईम काशमी याचे नाव देखील समोर
कमलेश तिवारी यांच्या पत्नीने नोंदविलेल्या एफआयआरनुसार मौलाना मुफ्ती नईम काशमी याच्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे. घटनास्थळावरून पोलिसांना एक मिठाईचा बॉक्स मिळाला असून त्यांनी यामध्ये हत्यार लपवून आणल्याची चर्चा आहे.

भाजप नेत्याबरोबर जमिनीवरून होता वाद
या प्रकरणात विविध गोष्टी समोर येत असून त्यांचा भाजप नेते शिवकुमार गुप्ता यांच्याशी मंदिराच्या जागेवरून विवाद सुरु होते. दहा दिवसांपूर्वीच त्यांनी कमलेश यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे त्यांच्यावर देखील कुटुंबीयांनी शंका व्यक्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांची दोन हल्लखोरांनी घरात घुसून गळा चिरून त्यांची हत्या करण्यात आली होती.

मुख्यमंत्री योगींनी दिले तपासाचे आदेश
या प्रकरणात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले असून लखनऊचे आयजी एसके भगत, लखनऊचे एसपी दिनेश पूरी आणि एसटीएफचे डेप्युटी एसपी पीके मिश्रा यांचा या एसआयटीमध्ये समावेश आहे. त्याचबरोबर उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना आदेश दिले असून त्यांना तपासाचे रिपोर्ट सादर करण्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like