मध्यरात्री कमलेश तिवारींना आला होता मारेकर्‍यांचा फोन, ‘Google Map’ वरून शोधलं ‘लोकेशन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हिंदू समाज पार्टीचे नेता कमलेश तिवारी हत्याकांडाबाबत नवीन माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हत्या करणाऱ्यांनी गुगल वरून कमलेश तिवारी यांच्या कार्यालयाचे लोकेशन शोधले होते. हे आरोपी रेल्वने लखनऊ येथे आले होते. मिळालेल्या माहितीनुसार कमलेश यांच्या बाबत माहिती घेण्यासाठी आरोपींनी इंटरनेटचा वापर केला आणि अनेक वेबसाईट वरून माहिती मिळवली.

बरेली मध्ये हत्या करणाऱ्यांचे लोकेशन
तिवारी यांची हत्या केल्यानंतर दोनीही आरोपींचे शेवटचे लोकेशन हे बरेली हेच होते. दोनीही आरोपी काही कालावधीसाठी बरेलीमध्ये थांबलेले होते त्यानंतर दोन्हीही आरोपी तेथून फरार झाले. याबाबतचा अधिक तपास एटीएस करत आहे.

रात्री 12.30 वाजता कमलेश तिवारी यांना आला होता फोन
हत्याऱ्यांबाबत माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी तीन मोबाईल नंबर तपासले ज्या नंबर वर पोलिसांचे लक्ष होते तो क्रमांक 17 ऑक्टोबरला सुरु झाला होता. हा क्रमांक राजस्थानचा होता. हत्येच्या एक दिवस आधी हत्याऱ्यांनी रात्री 12 नंतर कमलेश तिवारी यांना फोन केला होता.

पोलिसांच्या दहा टीम सक्रिय
कमलेश तिवारी यांच्या हत्याकांडाची तपासणी लवकर करण्यासाठी दहा टीम सक्रिय केल्या आहेत. युपी आणि गुजरातचे पोलीस देखील यामध्ये संयुक्त पद्धतीने काम करत आहेत. तसेच दिल्ली आणि लखनऊच्या फ्लाईट चे रेकॉर्ड सुद्धा तपासले जात आहेत.

नागपूरमधून एकाला अटक
तिवारी यांच्या हत्याकांडानंतर नागपुरातील मोमीनपुरा येथून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या व्यक्तीचे नाव सय्यद असीम हे आहे. याने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हिडीओ टाकून तिवारी यांना धमकी देखील दिली होती.

सुरतवरून तीन जणांना अटक
युपी पोलीस आणि गुजरात एटीएसने शुक्रवारी कमलेश तिवारी यांच्या हत्ये बाबत सुरत वरून तीन जणांना अटक केली होती. मौलाना मोहसिन शेख, फैजान पठान आणि राशिद पठान अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांच्या मते राशिद हा हत्याकांडाचा मास्टरमाइंड आहे. तो काही दिवसांपूर्वीच दुबई वरून भारतात आला होता. गुजरात पोलीस सध्या राशिदच्या पाकिस्तानी लिंकचा शोध घेत आहे कारण तो दुबईमध्ये पाकिस्तानी नागरिक म्हणून राहत होता.

शुक्रवारी लखनऊ दोन जणांनी हिंदू समाज पार्टीचे नेता कमलेश तिवारी यांची हत्या केली होती. तिवारी यांना चाकू खुपसण्यात आला होता यानंतर त्यांना रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला होता.

 

visit : Policenama.com