कमलेश तिवारी मर्डरकेस : पहिल्यांदा मानेवर गोळी झाडली, नंतर 13 वेळा चाकूनं ‘सपासप’ केले वार, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हिंदू समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमलेश तिवारी हत्याकांडाचा आता नवा खुलासा समोर आला आहे. कमलेश तिवारींचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे. रिपोर्टमधून खुलासा झाला की त्यांच्या मानेवर 13 वेळा चाकूने वार केले आहेत. त्यात उजव्या बाजूने आठ तर डाव्या बाजूने दोन असे वार करण्यात आले आहेत. तर मागून तीन वार करण्यात आले आहेत.

शुक्रवारी लखनऊमध्ये खुर्शीदाबागमध्ये राहणाऱ्या हिंदू समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कमलेश तिवारी यांची दोघांकडून हत्या करण्यात आली. दोघेजण मिठाईच्या डब्ब्यात पिस्तुल आणि चाकू लपवून घेऊन आले होते, ते कमलेशच्या ऑफिसमध्ये पोहचले, तेथे त्यांनी कमलेश यांच्या मानेवर गोळी मारली त्यानंतर चाकूने वार करण्यात आले. या हत्त्येनंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप अनावर झाला. लोक रस्त्यावर उतरले आणि अमीनाबादचा बाजार बंद करुन पोलीस आणि प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

अमीनाबादमध्ये लोकांनी रस्त्यावर बसची तोडफोड केली, तर पोस्टमार्टम हाऊसवर धरणे आंदोलन केले. हा तणाव पाहून पोलिसांनी खबरदारी म्हणून पोलीस फाटा तैनात केला. एसएसपी कलानिधी नैथानी यांनी सांगितले की एका तरुणीच्या लग्नासंबंधित वादाबाबत काही गोष्टी समोर आल्या. याशिवाय इतर बाबींवर तपास सुरु आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन एक पिस्तुल आणि एक बॉक्स जप्त केला आहे. परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये भगवे कपडे घातलेले दोन संशयित दिसले, ज्यांच्या संबंधित आता पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणी डीजीपी ओपी सिंह यांना एसटीएफला देखील तपास करण्यास सांगितले आहे.

एसएसपीने सांगितले की कमलेश खुर्शीदबागच्या ज्या घरात राहत होते, त्याचा पहिला मजल्यावर हिंदू समाज पार्टीचे कार्यालय आहे. दुपारी ते कुशीनगरच्या सौराष्ट्रजीत सिंह यांच्याबरोबर कार्यालयात बसले होते, तेव्हा भगवे कपडे घातलेले दोन तरुण तेथे आले, कमलेश कदाचित त्यांना ओळखत होते, त्या दोघांशी कमलेश यांनी चर्चा केली, त्या दोघांसाठी कमलेश यांनी चहा नाश्ता मागवला. काही वेळाने त्यांनी सौराष्ट्रजीत सिंह यांना सिगरेट आणि गुटखा आणण्यासाठी पाठवले.

सौराष्ट्रजीत सिंह जाताच त्या हल्लेखोरांना मिठाईच्या डब्यातून शस्त्र काढून कमलेश यांना गोळी मारली. यानंतर चाकूने छातीवर सापासप वार केले आणि गळा कापला. यानंतर हे हल्लेखोर फरार झाले. काही वेळाने सिगरेट, गुटखा आणण्यासाठी गेलेला सौराष्ट्रजीत सिंह परत आला तेव्हा त्याला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले कमलेश दिसले. घाबरलेला सौराष्ट्रजीत जोरात ओरडला त्यामुळे त्यांच्या कुटूंबातील काही जण घटनास्थळी दाखल झाले. या घटनेनंतर कमलेश यांना ट्रामा सेंटरला नेण्यात आले परंतू डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कमलेश यांच्या हत्येने राजधानीत खळबळ उडाली.

या घटनेनंतर हिंदू संघटनांमध्ये संतापाचे वातावरण आहे. शेकडो लोक घटनास्थळावर दाखल झाले. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण होते. यावेळी पोलीस आणि प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली, गणेशगंजपासून अमीनाबादपर्यंत दुकाने बंद करण्यात आली, ठिकठिकाणी गर्दी जमा झाली होती. लोकांकडून बसची तोडफोड करणयात आली, लोक पोस्टमार्टम हाऊसच्या बाहेर जमा झाले होते. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी