कमलेश तिवारींनी ‘मर्डर’च्या एक दिवसापूर्वी ‘ट्विटर’वर शेअर केली होती ‘या’ 16 ‘मंदिर-मस्जिद’च्या नावांची यादी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हिंदू महासभेचे कमलेश तिवारी यांची 18 ऑक्टोबर रोजी हत्या करण्यात आली त्याआधी एक दिवस म्हणजेच 17 तारखेला त्यांनी ट्विटरवर एक यादी शेअर केली होती. यामध्ये काही मशिदींची नावे होती. त्याचबरोबर काही मंदिरांची देखील नावे देण्यात आली होती. त्याचबरोबर कोणत्या शहरात कोणती मशीद आहे याचीदेखील माहिती या यादीमध्ये देण्यात आली होती.

हा होता उद्देश
त्यांनी जाहीर केलेल्या यादीमध्ये एकूण 16 मशिदींची नावे देण्यात आली आहेत. त्याचबरोबर लिहिण्यात आले आहे कि, या मशिदी ह्या मंदिरे तोडून बनवण्यात आली आहे. यामध्ये सहाव्या क्रमांकावर अयोध्येतील राम मंदिराचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर ज्ञानवापी आणि आलमगीर मशिदींचा समावेश आहे. यादीमध्ये शेवटच्या क्रमांकावर मथुरेतील ईदगाह या मशिदीचा उल्लेख करण्यात आला आहे.

कमलेश तिवारी हत्याकांड की ये सीसीटीवी फुटेज न्यूज18 के पास एक्सक्लूसिव है.

त्याचबरोबर यामध्ये एक धमकी देखील लिहिण्यात आली होती कि, राम मंदिरांबरोबरच अनेक जुन्या मंदिरांचे पुनर्निर्माण होणार आहे. हिंदूंनो संघर्ष करा. त्याचबरोबर दुसऱ्या संदेशात लिहिण्यात आले होते कि,भारतात हजारो मंदिरांच्या जमिनीवर मशिदी उभ्या आहेत.

अशाप्रकारे झाली लखनौमध्ये हत्या
कमलेश तिवारी यांची शुक्रवारी राहत्या घरामध्ये हत्या करण्यात आली होती. सुरुवातीला त्यांची गोळ्या झाडून हत्या केल्याची माहिती समोर आली होती. मात्र नंतर समोर आलेल्या माहितीनुसार, त्यांची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी एक बंदूक देखील जप्त केली आहे. कुणी ओळखीच्या व्यक्तीनेच त्यांची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.