कांदलगाव ग्रामपंचायत निवडणूक ई.व्ही.एम मशीनमध्ये घोटाळ्याची तक्रार

इंदापूर :पोलीसनामा ऑनलाईन

सुधाकर बोराटे

इंदापूर तालुक्यातील कांदलगाव ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीची मतमोजणी प्रक्रिया गुरुवार दि. २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता इंदापूर तहसील कार्यालय येथे पार पडली. यामध्ये मतदान ई.व्ही.एम मशीनवरती आक्षेप असल्याचे निवेदन गावातील गणेश दत्तात्रय बाबर व काही ग्रामस्थांनी इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्याकडे दिले असून त्याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी निवेदनादवारे करण्यात आली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d7c50f09-c253-11e8-845e-e364bceaa3c8′]

निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायत कांदलगाव सार्वत्रीक निवडणुकीचा निकाल दि २७/०९/२०१८ रोजी जाहीर झालेला आहे. सदर मतमोजणी करताना सदर ई.व्ही.एम मशीन ही हँग होत होती. त्यामुळे मशीन नीट चालत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सदर मशीनमध्ये काही घोटाळा केल्याची शक्यता नाकरता येत नाही. तसेच मतदानदिवशी दिनांक २६ सप्टेंबर रोजी केंद्राच्या १०० मीटर आवारात एक अनओळखी व्यक्ती विद्यालयाच्या कार्यालयामध्ये दिवसभर एकाच ठिकाणी बसून होती. त्यामुळे त्याची हालचाल ही संशयास्पद दिसून येत होती. या कारणास्तव ईव्हीएम मशीन हॅक करण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्याचा तातडीने खुलासा करावा व सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येवून फेरमतदान घेण्यात यावे. अशी तक्रार दाखल केली असून त्यादवारे चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

यावर तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी आपली मागणी संबंधित विभागाकडे तातडीने पाठवुन देत असल्याचे सांगितले. सदर ई.व्हीएम मशीनची तपासणी करण्यात यावी या संदर्भात निवेदनावर योगेश बाबर, विजय सोनवणे, संदीप बाबर , नवनाथ काशीद ,नीळकंठ भोसले ,नागेश बाबर ,समाधान रांखुडे ,महेंद्र बाबर, संदिप तुपे यांच्यासह अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

[amazon_link asins=’B00FRCNR6U,B073JYDK7P’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’17cd9306-c254-11e8-8f51-09bb2709ca65′]