Kane Williamson | केन विल्यमसनच्या नावावर आणखी एक विक्रम होण्याची शक्यता ! 66 वर्षांनंतर ‘रेकॉर्ड’?

मुबई : पोलीसनामा ऑनलाईन – Kane Williamson | भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील दुसऱ्या टेस्टला आजपासून मुंबईमध्ये सुरुवात होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील (World Test Championship) पुढील प्रवासासाठी ही टेस्ट जिंकणे दोन्ही टीमना आवश्यक आहे. भारतामधील टेस्ट सीरिजमध्ये यजमान टीम इंडियाचं पारडं नेहमीच जड असतं. पण याअगोदर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेली कानपुर टेस्ट (Kanpur Test) बरोबरीत सुटली होती. या टेस्टमधुन न्यूझीलंडने आपली क्षमता दाखवून दिली. न्यूझीलंडने या अगोदर भारताच्या होम ग्राउंडवर सलग 7 टेस्ट गमावल्या होत्या. न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसनच्या (Kane Williamson) नेतृत्वात कानपूरमध्ये न्यूझीलंडच्या टीमने हि परंपरा तोडली. यानंतर आता कॅप्टन केन विल्यमसनच्या नावावर आणखी एक विक्रम होण्याची शक्यता आहे.

 

न्यूझीलंडच्या टीमला आजवर भारतात कधीही टेस्ट सीरिज जिंकता आलेली नाही. 1988 साली त्यांनी भारतामध्ये अखेरची टेस्ट मॅच जिंकली होती. यानंतर भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 18 टेस्ट झाल्या. यामध्ये 9 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आणि 9 मॅच ड्रॉ झाल्या. न्यूझीलंडला आतापर्यंत भारतात 34 पैकी फक्त 2 टेस्ट जिंकता आल्या आहेत. न्यूझीलंडने भारतात पहिली टेस्ट 1955 साली खेळली होती, म्हणजेच 66 वर्षांमध्ये त्यांना भारतात एकदाही टेस्ट सीरिज जिंकता आलेली नाही.

टीम इंडियानं या टेस्ट सीरिजमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma), ऋषभ पंत (Rishabh Pant), जसप्रीत बुमराह (Jaspreet Bumrah)
आणि मोहम्मद शमी (Mohammed Shami) या चार प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली आहे. कॅप्टन विराट कोहलीसह (Virat Kohli)
अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) या टीम इंडियाच्या मिडल ऑर्डरमधील फलंदाजांना संघर्ष करावा लागत आहे.
त्यातच मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे हवामानात मोठा बदल झाला आहे. त्यामुळे वानखेडेचं पिच पहिल्या दिवशी स्विंग बॉलर्सना मदत करेल अशी शक्यता आहे. स्विंग बॉलिंग (Swing bowling) हे न्यूझीलंडचे बलस्थान आहे. त्यामुळेच केन विल्यमसनच्या न्यूझीलंडच्या टीमला मुंबई टेस्टसह 66 वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारतामध्ये सीरिज जिंकण्याची संधी आहे. आता केन विल्यमसन (Kane Williamson) हि सिरीज जिंकून हा विक्रम आपल्या नावावर करतो का ते पाहणे महत्वाचे आहे.

 

Web Title :- Kane Williamson | india vs new zealand 2nd test mumbai kane williamson eye on first test series win in india may be he will make record

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

IND Vs NZ | मुंबई टेस्टमध्ये टीम इंडियाला 3 मोठे धक्के ! दिग्गज खेळाडू दुखापतीमुळे बाहेर

Dr Amol Kolhe | राष्ट्रवादीचे खा. अमोल कोल्हेंची थेट मोर्दीवर टीका; म्हणाले – ’लसीकरण प्रमाणपत्रावर फोटो छापता, मग मृत्यूंची पण जबाबदारी घ्या’

Home Loan ट्रान्सफर करण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची घ्या काळजी, छोटी चूक सुद्धा पडू शकते महागात; जाणून घ्या