Kane Williamson Steps Down | केन विल्यमसनने सोडले कसोटी कर्णधारपद, ‘हा’ खेळाडू सांभाळणार न्यूझीलंडच्या कर्णधारपदाची धुरा

पोलीसनामा ऑनलाईन : केन विल्यमसनने (Kane Williamson Steps Down) न्यूझीलंड कसोटी संघाच्या कर्णधार पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाकडून याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता न्यूझीलंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज टीम साऊदी न्यूझीलंड कसोटी संघाचे नेतृत्व करणार आहे. तर टॉम लॅथम उपकर्णधार सांभाळणार आहे. (Kane Williamson Steps Down)

काय म्हणाला केन विल्यमसन?
केन विल्यमसन याने सांगितले कि वर्कलोडचे व्यवस्थापन करण्यासाठी व्यवस्थापनाशी बोलून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. टीम साऊदी हा न्यूझीलंडचा 31 वा कसोटी कर्णधार असणार आहे. न्यूझीलंडचा संघ या महिन्याच्या शेवटी टीम साऊदीच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा दौरा करणार आहे. यामध्ये ते यजमान संघासोबत 2 कसोटी
आणि 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहेत. ही मालिका 26 डिसेंबर ते 13 जानेवारी 2023 होणार आहे.

केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली किवी संघाची कामगिरी
कसोटी कर्णधारपदाची धुरा सांभाळल्यानंतर केन विल्यमसनने (Kane Williamson Steps Down) 6 वर्षांनी
या पदाचा राजीनामा दिला आहे. विल्यमसनने 38 कसोटी सामन्यांमध्ये किवी संघाचे नेतृत्व केले.
यामध्ये त्याने 22 कसोटी सामने जिंकले आहेत. तसेच गेल्या वर्षी विल्यमसनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड
संघाने अंतिम फेरीत भारताचा पराभव करून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021 जिंकली होती.

Web Title :- Kane Williamson Steps Down | kane williamson has resigned as the captain of the new zealand test team and tim southee will be the new captain of the team

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Bogus NA Order | पुण्यात बोगस NA ऑर्डर लावून दस्त नोंदणी करणाऱ्यांवर कारवाई करा, रोहन सुरवसे पाटील यांचे महसूल मंत्र्यांना निवेदन

Tejaswini Pandit | अभिनेत्री तेजस्विनी पंडितने दुनियादारी चित्रपटाबद्दल केला ‘हा’ मोठा गौप्यस्फोट