‘माझ्या ड्रिंकमध्ये काहीतरी मिसळलं जात होतं, मी पाहिली ड्रग्सची अंधेरी दुनिया’, कंगना रणौतचा दावा

मुंबई : वृत्तसंस्था – अभिनेत्री कंगना रनौतने आत्तापर्यंत घराणेशाही पासून घरच्या वादापर्यंत असे अनेक आरोप केले आहेत. आता सगळे आरोप खरे असतीलच असं नाही, पण तिला चाहत्यांचा चांगलाच सपोर्ट मिळत आहे. सुशांत प्रकरणात ड्रगचा मुद्दा जेव्हापासून समोर आला, तेव्हा कंगनाने तिच्या आयुष्यातील काही किस्से सांगायला सुरुवात केली आहे.

कंगनाच्या ड्रिंकमध्ये काहीतरी मिसळलं जात होतं?

कंगनाने एक शॉकिंग गोष्ट सांगितली की तिच्या ड्रिंकमध्ये काहीतरी मिसळलं जात होतं. तिनं सांगितलं, मी लहान होते तेव्हा माझा मेंटर ज्याने मला खूप त्रास दिला, तो माझ्या ड्रिंकमध्ये काहीतरी मिसळत होता, आणि तो मला पोलिसांकडे जाण्यापासून देखील रोखत होता. जेव्हा मी माझ्या आयुष्यात मोठ्या सिनेमांमध्ये काम केलं, मोठ्या पार्ट्यांमध्ये गेले तेव्हा मी ती ड्रगची खतरनाक दुनिया पाहिली आहे.

कंगनाने आरोप लावला आहे पण कोणाचंही नाव घेतलं नाही. ती ककोणाबद्दल बोलत आहे , कोण तिच्या ड्रिंक मध्ये काहीतरी मिसळत होतं ते मात्र स्पष्ट झालं नाही. पण तिने तिच्या ट्विट मध्ये त्या पार्टीचा उल्लेख केला जिथं ड्रगचा वापर केला जातो. तिने सांगितलं की खूप आधी तिला या पार्टीमध्ये बोलवण्यात आलं होतं. तिचं हे ट्विट वेगाने व्हायरल होत आहे.

कंगना एवढंच बोलून थांबली नाही तर तिने असाही दावा केला आहे की, फिल्म इंडस्ट्रीमध्ये कोकिनचा सर्वात जास्त वापर केला जातो. तिच्या मते आधी पार्टीमध्ये हे अनेकवेळा फ्री दिलं जायचं, पण नंतर MDMA चे क्रिस्टल मिसळून दिलं जातं.

कंगनाचा बॉलिवूड वर निशाणा

याच्या आधी कंगनाने अजून एका ट्विट मध्ये म्हटलं होतं की, बॉलिवूड अभिनेत्यांची नारकोटिक टेस्ट केली तर अनेकजण जेलमध्ये जातील. तिचं हे ट्विट देखील खूप व्हायरल झालं होतं. तिचं अशा प्रकारे बेधडकपणे या मुद्द्यांवर बोलणं अनेकांना आवडत आहे. सुशांत सिंह प्रकरणात NCB ने चौकशी सुरु केली आहे. त्यांची चौकशी रिया चक्रावर्तीच्या भोवतीच फिरेल शक्यता आहे.