अखेर कंगनाने घेतली माघार; अनधिकृत बांधकाम नियमित करण्यासाठी करणार BMC कडे अर्ज

मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणौत हिच्या खार वेस्ट येथील बंगल्यातील अनधिकृत बांधकाम पाडल्याबद्दल उच्च न्यायालयात गेलेल्या व तिच्यासाठी आंदोलन करणार्‍या भाजप नेत्यांना कंगना ने आता तोंडावर पाडले आहे. मुंबईतील खार येथील कंगनाच्या घरात अनधिकृत बांधकामाचा ठपका ठेवण्यात आला होता. याबद्दल मुंबई महापालिकेने कंगनाला नोटीस बजावली होती. या विरोधात तिने अगोदर उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, बुधवारी झालेल्या सुनावणीत घरात असलेल्या अनधिकृत बांधकाम तोडकाम प्रकरणी याचिका कंगनाकडून मागे घेण्यात आली. जे काम अनधिकृत आहे, ते अधिकृत करण्यासाठी कंगना राणौत आता मुंबई महापालिकेकडे रितसर अर्ज करणार आहे. याबद्दल मुंबई महापालिकेने पुढील चार आठवड्यांमध्ये कंगनाच्या अर्जावर काय निर्णय घेतला ते जाहीर करावे, असा आदेश उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिला आहे. तसेच अनधिकृत बांधकाम तोडकामाला स्थगिती कायम राहणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

महापालिकेचा आदेश कंगनाच्या विरोधात गेला तर कंगना बीएमसीच्या विरोधात अपील करु शकते. त्यासाठी २ आठवड्यांचा अवधी असणार आहे. निर्णय कंगनाच्या विरोधात जरी गेला तरी २ आठवडे महापालिकेला कोणतीही कारवाई करता येणार नाही.

मुंबईतील खार वेस्ट येथील एका बिल्डिंगमध्ये कंगना राणौतचा पाचव्या मजल्यावर फ्लॅट आहे. विशेष म्हणजे पाचव्या मजल्यावर कंगनाचे एकूण तीन फ्लॅट आहे. कंगनाने फ्लॅट घेतल्यानंतर ५ वर्षांनी तिने बेकायदा बांधकाम केल्याची तक्रार आली होती.

तक्रारीनंतर कंनगाच्या फ्लॅटची पाहणी करुन महापालिकेने तिला मार्च २०१८ मध्ये नोटीस दिली होती. त्यानंतर महाराष्ट्र सरकारवर टिष्ट्वट करुन हल्ला केल्यानंतर मुंबई महापालिकेने हे बांधकाम पाडले होते.