कंगना करते ‘कान्स २०१९’ ची तयारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रणौत ही आगामी ७२ व्या कान्स चित्रपट फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर चालणार आहे. एक ब्रॅंन्ड असोसिएशनचा भाग म्हणून ती या अनुभवाची वाट पाहत आहे. या चित्रपट महोत्सवात ती दुसरी वेळ सहभाग घेत आहे.

‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ चित्रपटात काम करणारी कंगना वोडका ब्रॅंड ग्रे गूससाठी १६ ते १८ मे दरम्यान फ्रेंच रिवेरा येथे प्रवास करणार आहे. ग्रे गूस आपल्या नवीन ग्लोबल प्लेटफॉर्म लाइव विक्टोरियसली माध्यमातून सिनेमॅटिक क्षणांचा उत्सव साजरा करणार आहे.

कंगना म्हणाली की, ‘मागच्या वर्षी कान्स चित्रपट महोत्सवात पदार्पण केल्यानंतर मी पुन्हा ‘लग्जरी के ग्लोबल आईकॉन’ सोबत एका अशा प्रतिष्ठित मंचावर भारतीय चित्रपटाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी खुप उत्साहाने वाट पाहत आहे. माझ्या आत्तापर्यंच्या खुप साऱ्या आठवणी आहे, ज्यामध्ये मोठे आणि छोटे क्षण दोन्ही सामिल आहे.’

कंगना पुढे म्हणाली की, ‘ ग्रे गूस हा जीवनशैलीचा आनंद घेण्यासाठी, स्वतंत्र जीवन जगण्याविषयी आणि भारतीय सिनेमाचा उत्सव साजरा करण्यासाठी आहे’. बकार्डी इंडिया मार्केटिंगचे वरिष्ठ अंशुमन गोयन ने कंगना ला याविषयी बरोबर समजून म्हणाले की, ‘ग्रे गुस हे भारतीय सिनेमातील प्रतिभा विकासाचे प्रतीक आहे आणि यावर्षी पुन्हा एकदा प्रतिष्ठित ‘कान्स फिल्म महोत्सवात’ पुन्हा आम्ही आमच्यासह त्याच्या प्रतिक्षेत आहोत. हा महोत्सव १४ ते २५ मे या दरम्यान आयोजित करण्यात येइल.

https://www.instagram.com/p/BY43SygH6Yq/