ही तर भाजपची पोपट, काँग्रेस मंत्र्याची कंगनावर टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर सोबत केल्याने कंगना राणौत विरुद्ध शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. आता तर केंद्र सरकारकडून Y प्लस दर्जाची सुरक्षा कंगनाला देण्यात आली आहे. कंगनाला Y प्लस सुरक्षा दिल्याने नवा वादाला तोंड फुटले आहे. या मुद्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी कंगना राणौतवर जळजळीत टीका केली आहे.

कंगना राणौतने मुंबईला पाकव्याप्त भाग असल्याचे म्हटले होते. मुंबईत कुणी पाकव्याप्त भाग म्हणत असेल आणि त्यावर विश्वास ठेवणे म्हणजे देशभक्तपणा आहे का ? असा संतप्त सवाल विजय वड्डेटीवार यांनी केला आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. वड्डेटीवार पुढे म्हणाले, जर असं वक्तव्य करुन कंगना देशभक्त ठरत असेल तर वाय कशाला तिला झेड सुरक्षा द्या. कंगना ही भाजपची पोपट आहे, अशी जळजळीत टीका विजय वड्डेटीवार यांनी केली आहे.

विशेष म्हणजे, कंगना विरुद्ध शिवसेना वाद पेटला असताना आता या वादात केंद्रीय गृह मंत्री अमित शहांनी उघडी घेतली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने कंगनाला वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंगना विरोधात सुरु असलेल्या आंदोलनामुळे तिला केंद्रीय गृह मंत्रालयाने वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे. राज्य सरकारने या प्रकरणात घेतली भूमिका पाहता केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचे सुत्रांनी सांगितले.

Y सुरक्षा म्हणजे काय ?
वाय दर्जाच्या सुरक्षेमध्ये एकूण 11 सुरक्षा कर्मचारी तैनात असतात. यात दोन कमांडो तैनात असतात. ही सुरक्षा 24X7 असते. आता ही सुरक्षा व्यवस्था थेट सीआरपीएफ सांभाळू शकते.