‘उघडपणे सांगते मी मराठा आहे, माझं काय वाईट करणार ?’ : कंगना रणौत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जेव्हापासून कंगना रनौतने मुंबईची तुलना पीओकेशी केली आहे, तेव्हापासून ती ट्रोल होत आहे. कारण आता तिचे हे विधान शिवसेना नेते संजय राऊत यांच्याविरोधात असल्याने अशात आता संपूर्ण शिवसेनाही तिच्यामागे लागली आहे. पण कंगना घाबरलेलीही नाही किंवा तिच्या वक्तव्यांपासून मागेही हटलेली नाही. ती अजूनही ट्विट करुन आपल्या विरोधकांवर निशाणा साधत आहे.

कंगनाने स्वतःला मराठा म्हटले
आता पुन्हा एकदा कंगनाने संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. तिने स्वतःला एक मराठा म्हटले आहे. ती ट्विट करत लिहिते- महाराष्ट्र कोणाच्याही बापाचा नाही, ज्याने मराठी अभिमान बाळगला आहे महाराष्ट्र त्याचा आहे. आणि मी म्हणते हो आहे मी मराठा, काय करायचे ते करा? इतकेच नाही तर कंगनाने आणखी एका ट्विटमध्ये विरोधकांना खुशामती म्हटले आहे. तिचा असा विश्वास आहे की, जे लोक या वेळी तिला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत, हे तेच लोक आहेत ज्यांनी तिच्या चित्रपटांना विरोध केला होता, जेव्हा तिने मोठ्या पडद्यावर राणी लक्ष्मीबाईंची भूमिका साकारली होती.

कंगना ट्वीट करून लिहिते- या क्षणी जे कोणी खुशामती महाराष्ट्रावर आपले प्रेम दाखवत आहे, त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे कि मी पहिली अभिनेत्री आणि डायरेक्टर आहे, जी मराठ्यांचा सन्मान शिवाजी महाराज आणि राणी लक्ष्मीबाईंना पडद्यावर घेऊन आली होती. पण त्यावेळी माझा तीव्र विरोध केला गेला होता. या ट्विटमध्ये कंगना तिच्या मणिकर्णिका चित्रपटाबाबत बोलत आहे. चित्रपटात तिने राणी लक्ष्मीबाईंची भूमिका साकारली होती. आता कंगनाने या ट्विटद्वारे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की, तीसुद्धा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा खूप आदर करते, पण महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्यांना खुशामती म्हणणे, तिला पुन्हा वादात आणू शकते.

कोण आहेत महाराष्ट्राचे ठेकेदार?
पण कंगना इथेच थांबली नाही. तिने संजय राऊत यांच्यासारख्या नेत्यांना महाराष्ट्राचा ठेकेदार म्हटले आणि राज्याचा सन्मान करण्यासाठी त्यांनी काय केले, असा प्रश्न केला. ट्विटमध्ये लिहिले आहे- त्यांची लायकी नाहीये, इंडस्ट्रीच्या शंभर वर्षात मराठा अभिमानावर एकही चित्रपट बनवलेला नाही. मी इस्लाम डॉमिनेट इंडस्ट्रीत माझे आयुष्य आणि करिअर पणाला लावले, शिवाजी महाराज आणि राणी लक्ष्मीबाईंवर चित्रपट बनवला, आज महाराष्ट्रातील या ठेकेदारांना विचारा काय केले आहे महाराष्ट्रासाठी?

कंगनाकडून सातत्याने होणारे हे ट्विट्स केवळ वाद वाढवणारे आहेत. पीओकेच्या विधानावरून सुरू झालेला वाद आता महाराष्ट्राच्या अस्मितेपर्यंत गेला आहे. अशा परिस्थितीत नेत्यांचे विधानही आता आणखी तीव्र होताना दिसेल.