‘पंगा गर्ल’ कंगनानं आतापर्यंत कोणा-कोणासोबत घेतलाय ‘पंगा’ ? ‘इथं’ पहा यादी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार कंगना रणौत अ‍ॅक्ट्रेस तर आहेच शिवाय ती कॉन्स्ट्रोव्हर्सी क्वीनही आहे. .आपल्या बिंधास्त वक्तव्यानं ती अनेकदा वादात सापडल्यानं चर्चेत आली आहे. नुकतीच ती इंदिरा जय सिंग आणि दीपिकाबद्दलच्या वक्तव्यानं चर्चेत आली होती. कंगनानं गेल्या अनेक वर्षांपासून स्टार्स, पत्रकार, डायेरक्टर्स आणि बॉलिवूड सिस्टीमसोबतही पंगा घेतला आहे. पंगा सिनेमाच्या आधी जाणून घेऊयात कंगनानं कोणाकोणासोबत पंगा घेतला आहे.

रिपोर्टनुसार कंगना आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात आदित्य पांचोलीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. तिनं आदित्यवर हिंसा आणि हाऊस अरेस्टचा आरोप लावला होता. कंगना म्हणाली होती की, “मला फिजिकली अब्युज करण्यात आलं होतं. तो माझ्या बापाच्या वयाचा होता. मी 17 वर्षांची असताना त्यानं माझ्या डोक्यात मारलं होतं.” तिनं या प्रकरणी तक्रारही दाखल केली होती.

यानंतर कंगना शेखर सुमनचा मुलगा अध्ययन सुमनसोबत नात्यात होती. ब्रेकअपनंतर तिनं त्याच्या फॅमिलीवर ब्लॅक मॅजिकचा आरोप केला होता. अध्ययन म्हणाला होती की, “कोणाचा वापर करून कोणाला कसं फेकून द्यायचं हे कंगनाला चांगलं माहिती आहे.”

हृतिक रोशनच्या अफेअरला घेऊन कंगना जोरदार चर्चेत आली होती. एका रिपोर्ट समोर आला होता ज्यात म्हटलं होतं की, आशिकी 3 सिनेमातून कंगनाला काढण्यात आलं आहे. कारण या सिनेमात हृतिक काम करणार आहे. यावेळी कंगना जाम भडकली होती. अशा अफवा येतातच कुठून असं तिनं म्हटलं होतं. हृतिकनंही तिला जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं.

कॉफी विद करणमध्येही तिनं कंगनानं नेपोटीज्मचा वाद ट्रेंडमध्ये आणण्याचं काम केलं होतं. 2017 साली आलेल्या तिच्या सिमरन सिनेमाच्या वेळीही खूप वाद झाला होता. रायटर अपूर्व असरानी यांनी कंगनावर राईटींग क्रेडिट चोरल्याचा आरोप केला होता. स्टोरी रायटर म्हणून कंगनाचं नाव आल्यानं असरानी नाराज झाले होते.

रणबीर कूपर आणि आलिया भट्ट यांच्यावरही कंगना भडकली आहे. देशाच्या मुद्द्यावरून तिनं तिच्या संतप्त भावना मांडल्या होत्या. यानंतर करणी सेनेलाही कंगनाच्या रागाचा सामना करावा लागला आहे. मणिकर्णिका सिनेमात राणी लक्ष्मीबाईंची इमेज खराब करण्याचा प्रयत्न केला आहे असा आरोप करणी सेनेनं केला होता. यावेळी तिनं सांगितलं होतं की, “त्यांनी सतत धमकावणं बंद करायला हवं. मीही एक राजपूत आहे. मी सर्वांनाच नष्ट करेन.”

जजमेंटल है क्या सिनेमादरम्यान कंगना आणि एका पत्रकाराचा चांगलाच वाद झाला होता. त्यानं मणिकर्णिका सिनेमाबद्दल वाईट लहिलं होतं असा आरोप तिनं केला होता. हा मुद्दा खूप चर्चेत आला होता. मी टू मूवमेंटवरही तिनं भाष्य केलं होतं आणि ती चर्चेत आली होती.

मणिकर्णिका सिनेमादरम्यानही ती वादात सापडली होती. सिनेमाचे डायरेक्टर कृष सिनेमापासून वेगळे झाले होते. नंतर सोनू सूदही सिनेमातून बाहेर पडला होता. 14 फेब्रवारी 2019 रोजी पुलवामा हल्ला झाला होता. यानंतर शबाना आझमी आणि जावेद अख्ततर पाकिस्तानातील कार्यक्रमात सहभागी होणार होते. कंगना म्हणाली होती, “इंडस्ट्रीत अनेक अँटी नॅशनल लोक आहेत. शबानासारखे लोक टुकडे टुकडे गँगला प्रोत्साहन देतात.”

कंगना आणि सोनम कपूरमध्येदेखील वाद झाला आहे.
एका मुलाखतीत कंगनाला अनुष्का शर्मा, कॅटरीना कैफ, दीपिका आणि करीना यांच्यात बेस्ट कोण आहे असं विचारण्यात आलं होतं. कंगना म्हणाली होती, “मला नाही वाटत ही त्यांची अ‍ॅक्टींग आहे. अ‍ॅक्टर आणि स्टार वेगळ्या संकल्पना आहेत. ज्याचं नाव तुम्ही घेता त्या स्टार्स आहेत. त्यांनी थोडी जरी अ‍ॅक्टींग केली तरी त्याची चर्चा होते.”

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

You might also like