शेतकर्‍यांना दहशतवादी म्हणणारी कंगाना ‘शेफारली’य, अभिनेत्रीनं आणि भाजपा नेत्यांनी माफी मागावी

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर बॉलिवूडमधील निपोटिझम वर टीकास्त्र सोडल्याने कंगना राणौत सगळीकडे चर्चेत आली होती. त्यानंतर तिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर करत शिवसेनेसोबत पंगा घेतला होता. अशातच आता कंगनाने शेतकऱ्यांना दहशतवादी संबोधत शेतकऱ्यांवर टीका केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी कंगनावर निशाणा साधला आहे.

शेतकऱ्यांना दहशदवादी म्हणल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. यासंदर्भात सचिन सावंत यांनी एक ट्विट करत म्हणाले, ‘आता कंगना राणौत देशातील शेतकऱ्यांना आतंकवादी म्हणाली आहे. कंगनाने केलेल्या या वक्तव्यामुळे मोदी सरकारने आणि महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी शेतकऱ्यांची माफी मागिलतीच पाहिजे. तसेच मोदी सरकारने कंगना राणौतला दिलेल्या वाय प्लस सुरक्षा आणि पाठींब्यामुळेच ही झाशीची राणी एवढी शेफारली आहे. आम्ही भाजप आणि कंगना राणौत दोघांचा जाहीर निषेध करत आहोत’, असं सावंत यांनी म्हटलं आहे.

काय म्हटले होते कंगनाने

केंद्र सरकारच्या विरुद्ध शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्विट केलं होत. हेच ट्विट रिट्विट करत कंगनाने शेतकऱ्यांवर टीका केली होती. ‘पंतप्रधानजी जे लोक झोपले आहेत त्यांना जाग करत येईल. ज्यांचा गैरसमज झाला आहे त्यांना समजवता येईल. पण जो न समजण्याची अॅक्टिंग करत असेल जो झोपण्याची नाटक करत असेल तर त्याला कितीही जागवून किंवा समजावून काहीच उपयोग नाही. हे तेच दहशतवादी आहेत ज्यांनी सीएए ला विरोध दर्शवत रक्ताचे पाठ वाहिले होते. प्रत्यक्षात मात्र सीएए कायद्या मुळे एकाही व्यक्तीच नागरिकत्व हिरावून घेतलं नाही’, असे ट्विट कंगनाने केलं होत.

तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी विषयक विधयकावरुन शेतकऱ्यांना आश्वस्त करणारे ट्विट केलं होते. त्यात ते म्हणाले, एमएसपी व्यवस्था सुरु राहणार असून, शेतमालाची खरेदी केंद्र सरकार करणार आहे. आम्ही येथे शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आहोत. शेतकऱ्यांच्या साह्यासाठी आम्ही आवश्यक ते प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलं होते.