राजकुमार राव आणि कंगना ‘मेंटल है क्या’ ; दोघांनी जिभेवर धरलंय एकच ब्लेड… फोटो होतोय व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री कंगना रनौत यांचा आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कंगना आणि राजकुमार या दोघांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांचा हा चाहतवर्ग त्यांच्या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यांच्या आगामी सिनेमाचं नाव आहे मेंटल है क्या. एक पोस्टरद्वारे या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित करण्यात आली आहे.

तरण आदर्श यांनी कंगना आणि राजकुमारचा एक फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्यात कंगना आणि राजकुमार एकमेकांच्या अगदी जवळ आले आहेत आणि त्या दोघांनी एकच ब्लेड जिभेवर धरले आहे. असे दिसत आहे. यातून प्रदर्शनाची तारीख सांगितली आहे. कंगना आणि राजकुमार यांचा हा फोटो सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

कंगना आणि राजकुमार यांचा मेंटल है क्या हा सिनेमा येत्या 21 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी हा सिनेमा मार्चमध्येच प्रदर्शित होणार होता. परंतु असे समजत आहे की, कंगनाने या सिनेमाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा आग्रह केल्याने सिनेमाचे प्रदर्शन पुढे ढकलले आहे अशी चर्चा पाहायला मिळत आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक प्रकाश कोवेलामुदी यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. शैलेश आर. सिंह आणि एकता कपूर यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. हा सिनेमा एक सायकॉलॉजिकल थ्रीलर असावा असा अंदाज आहे.