कंंगना राणौत पुन्हा वादात 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

अभिनेत्री कंंगना राणौत पुन्हा एका नव्या वादात अडकली आहे. कंगना, तिची बहीण रंगोली यांच्याविरोधात प्रकाश रोहिरा या प्रॉपर्टी डीलरने खार पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. यानंतर खार पोलिसांनी कंगनाला समन्स बजावल्याचे कळते. कंगनाने मुंबईतील पाली हिल येथे तीन हजारांवर स्क्वेअर फुटची एक प्रॉपर्टी खरेदी केली. यासाठी कंगनाने १ कोटी ३ लाख रूपयांची स्टँम्प ड्युटी भरली. नियमानुसार, या खरेदी व्यवहारावेळी कंगनाने प्रॉपर्टी डिलरला १ टक्का कमिशन दिले होते. ही रक्कम जवळपास २२ लाख रूपये होती. पण आता प्रॉपर्टी डीलरने २ टक्के कमिशनची मागणी केली आहे.  या सर्व प्रकरणाला पुढे कोणतं वळण मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
[amazon_link asins=’B07B9SMJ19,B06XS2HKJ5′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’02bdf13b-a488-11e8-bd0b-33805c44eaa4′]
रिअल लाईफमध्ये वादग्रस्त असणाऱ्या कंगनाने आतापर्यंत अनेक बॉक्स आॅफिसवर यशश्वी चित्रपट दिले आहेत. लवकरच कंगनाचा ‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांशी’हा बहुचर्चित चित्रपट येत आहे.
Advt.