Video : पत्रकारांनी ‘बॅन’ केल्यानंतर कंगना रनौत म्हणाली, ‘मी हात जोडून विनंती करते मला बॅन करा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पत्रकार जस्टिन राव आणि कंगना रणौत यांच्यातील वाद थांबता थांबेना. मंगळवारी एंटरटेंमेंट जर्नलिस्ट गिल्ड ऑफ इंडिया नावाच्या संस्थेने एक लेटर पाठवत कंगनाला बॅन करण्याची घोषणा केली. यानंतर खुद्द कंगनानेच तिल बॅन करण्यासाठी विनंती केली आहे. एक व्हिडीओ शेअर करत कंगना म्हणाली की, “मी तुम्हाला हात जोडून विनंती करते की, मला बॅन करा. कारण मला नाही वाटत की, माझ्यामुळे तुमची घरातील चूल पेटावी.” कंगनाने मीडियाच्या एका वर्गावर हा निशाणा साधला आहे.

 

व्हिडीओच्या सुरुवातीलाच इंडियन मीडियाबद्दल बोलायचे सांगत तिने मीडियाचे कौतुक केले. आपल्या यशासाठी त्यांचे आभारही मानले. यानंतर तिची बोलण्याची टोन एकदम बदलूनच गेली.

कंगना म्हणाली की, “एक मीडियाचा सेक्शन असा आहे जो वाळवीसारखा देशाला खात आहे. हळूहळू देशाची अस्मिता आणि एकतेवर हळूहळू अटॅक करत आहे. खोट्या अफवा पसरवत असतात. ते सर्वांसमोर आपले देशद्रोही विचार खुलेआम मांडत आहेत. अशांसाठी संविधानातही कोणती शिक्षा नाही. यामुळे माझं सर्वात जास्त नुकसान झालं आहे. मीडिया विकाऊ आहे. जे स्वत:ला सेकुलर आणि लिबरल सांगतात परंतु असे काही नाही. १० पासही नाही आहेत हे लोक.”

नाव न घेता जस्टिनवर आरोप
कंगनाने नाव न घेता जस्टिनवर आरोप लावले की, तो आणि त्याच्यासारखे दुसरे पत्रकार नेहमीच माझी खिल्ली उडवत असतात. त्यांच्या म्हणाली की, “मी जेव्हा विश्व पर्यावरण दिवसानिमित्त प्लास्टिक बॅनला घेऊन कॅम्पेन केलं तेव्हा त्याने खिल्ली उडवल्याचे आढळले. जनावरांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात कॅम्पेन केलं तेव्हा त्याचीही खिल्ली उडवली. शहीदावर केलेल्या सिनेमाच्या नावाचीही खिल्ली उडवली होती.” यानंतर कंगनाने बॅन करण्यासाठी विनंती करताना म्हटले की, “तुम्हा लोकांना खरेदी करण्यासाठी लाखांचीही गरज नाही. तुम्ही लोक तर ५६-६० रुपयांत विकले जातात.”

आरोग्यविषयक वृत्त –

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

वॅक्स करताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी !

‘या’ कारणामुळे फुटतो घोळाणा ; घ्या जाणून

‘नागीण’ या आजारावर ‘हे’ घरगुती उपाय !

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात’

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

You might also like