Video : ‘जजमेंटल है क्या ?’ सिनेमाच्या ट्रेलर लाँचिंग दरम्यान दिसला कंगनाचा ‘वंडर वुमन’ लुक !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत जितकी बिंधास्त आहे. तितकाच बिंधास्त तिचा ड्रेसिंग सेन्सही आहे. या गोष्टीचा पुरावा देत आहे. तिच्या सिनेमाच्या ट्रेलर लाँचिंगवेळी तिने घातलेला ड्रेस. जजमेंटल है क्या ? या तिच्या सिनेमाच्या लाँचवेळी तिने घातलेल्या ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधून घेतल्याचे दिसून आले.

https://www.instagram.com/p/Bzat1i-F9iM/

जजमेंटल है क्या या सिनेमाच्या ट्रेलर लाँचिंगदरम्यान कंगना रणौत गोल्डन आणि काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये वंडर वुमनच्या लुकमध्ये दिसत आहे. लाँचिंगसाठी या लुकमध्ये आलेल्या कंगनाचा हा वंडर वुमन लुक क्षणातच व्हायरल झाला. चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर कंगानाचे हे फोटो शेअर केले आहेत.

https://www.instagram.com/p/BzattQDl39Y/

अभिनेत्री कंगना रणौत आणि राजकुमार राव यांची प्रमुख भूमिका असणारा जजमेंटल है क्या. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला असून हा ट्रेलर सस्पेंस, थ्रिलर आणि रोमँसने भरपूर आहे. या सिनेमात राजकुमार राव आणि कंगनाची जोडी प्रेक्षकांना आवडताना दिसत आहे. हा ट्रेलर सुरुवातीपासून शेवटपर्यंत कन्फ्युनजनने भरेलेला आहे. ट्रेलर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. सोशल मीडियावर अनेकांनी याबाबत आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

https://youtu.be/BywLe4m2j2I

हा सिनेमा २६ जुलै रोजी रिलीज होणार आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाचं आणि कृती सेनन व दिलजीत दोसांझचा सिनेमा अर्जुन पटियाला या सिनेमाचं क्लॅश होणार होणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन प्रकाश कोवेलामुडी यांनी केलं आहे तर स्टोरी कनिका ढिल्लोने लिहीली आहे. आधी या सिनेमाचं नाव मेंटल है क्या असं होतं. परंतु नावाला घेऊन वाद झाल्यानंतर या सिनेमाचं नाव जजमेंटल है क्या असं केलं आहे. क्वीन नंतर ही दुसरी वेळ आहे की, राजकुमार राव आणि कंगना एकत्र दिसणार आहेत.

https://www.instagram.com/p/Bzat3-kFAZG/

https://www.instagram.com/p/Bza0gvfl4as/

https://www.instagram.com/p/Bza7ddoFQ1-/

सिनेजगत

मुंबईतील पावसाचा बॉलिवूडवर देखील ‘इम्पॅक्ट’, ‘या’ चित्रपटासह इतरांना ‘फटका’

जायरा वसीमसारखे अजिबात नाहीत ‘या’ ‘टॉप’ ४ बालिवूड अभिनेत्रींचे ‘विचार’

Video : अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत ‘बोल्ड’ सीन करताना ‘हा’ अभिनेता ‘आऊट ऑफ कंट्रोल’ !

बहुजननामा

अनुसूचित जातीमध्ये १७ ओबीसी जाती समाविष्ट करण्याचा योगी सरकारचा निर्णय बेकायदा

आगामी विधानसभेसाठी वंचित-काँग्रेस एकत्र आल्यास समीकरणे बदलतील

शहरातील सर्व बांधकामे तातडीने थांबवा – बाबा आढाव