चंदीगडला पोहचताच कंगना पुन्हा ‘बरळली’, म्हणाली – ‘यावेळी मी वाचले, सोनिया सेनेमुळं मुंबई असुरक्षित’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : महाराष्ट्र सरकारबरोबर झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर चित्रपट अभिनेत्री कंगना रणौत मुंबईहून परतल्या आहेत. सोमवारी सकाळी कंगना मनालीला रवाना झाल्या, त्यादरम्यान चंदीगडला पोहोचून त्यांनी ट्विट केले आणि शिवसेनेवर हल्ला केला. कंगनाने लिहिले की, मुंबईत पूर्वीसारखी सुरक्षा राहिलेली नाही, यासाठी त्यांनी शिवसेनेला सोनिया सेना असल्याचे कारण दिले.

कंगना रणौतने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की चंदीगडमध्ये उतरताच माझी सुरक्षा ही नाममात्र राहिली आहे, लोक आनंदाने शुभेच्छा देत आहेत. असं वाटतं की मी या वेळी बचावले, एक दिवस होता जेव्हा मुंबईत आईच्या कुशीत असल्यासारखे वाटायचे. सध्याचे दिवस असे आहेत प्राण वाचला म्हणजे खूप झाले, शिवसेना सोनिया सेना होताच मुंबईत दहशतवादी प्रशासनाचा बोलबाला.

याशिवाय कंगना रणौत यांनी आणखी एक ट्विट केले. त्यांनी लिहिले की, दिल्लीचे हृदय फाटून या वर्षी तेथे रक्त सांडले आहे, सोनिया सेनेने मुंबईत आझाद काश्मीरचा जयघोष केला. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की आज स्वातंत्र्याची किंमत केवळ आवाज आहे. मला आपला आवाज द्या, नाहीतर तो दिवस दूर नाही जेव्हा स्वातंत्र्याची किंमत फक्त आणि फक्त रक्त असेल.

विशेष म्हणजे कंगना रणौतने असा आरोप केला आहे की त्या मुंबईत असुरक्षित आहेत आणि सतत त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. महाराष्ट्र सरकार आणि शिवसेनेबरोबर कंगनाचा सातत्याने वाद सुरूच आहे, या विषयावर त्यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती.