रोहित शर्माच्या ट्विटवर भडकली कंगना रणौत, म्हणाली- ‘हे सर्व क्रिकेटपटू म्हणजे धोबी का कुत्ता, ना घर का ना घाट का’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  दिल्लीच्या वेशीवर गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. केंद्रानं आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात हे आंदोलन सुरू आहे. पंजाबी सिंगर आणि अभिनेत्यांनीही याला पाठींबा दिला आहे. हॉलिवूड सिंगर, पॉप स्टार, अ‍ॅक्ट्रेस रिहाना (Rihanna) हिनंही शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विट केलं आहे. यानंतर इंटरनॅशनल सेलेब्सही या आंदोलनावर मत व्यक्त करताना दिसले. रिहानानंतर ग्रेटा थनबर्ग (Greta Thunberg), एक्स अ‍ॅडल्ट स्टार मिया खलिफा (Mia Khalifa) यांनी देखील शेतकरी आंदोलनाबद्दल ट्विट केलं. काही बॉलिवूड सेलेब्सही याला पाठींबा देत आहे तर काही विरोध करत आहेत. अनेक क्रिकटपटूंनीही यावर भाष्य केलं आहे. टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मानंही यावर भाष्य केलं आहे. रोहितच्या ट्विटनंतर आता बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस कंगना रणौत (Kangana Ranaut) ही सर्व खेळाडूंवर संतापली आहे.

काय म्हणाला रोहित शर्मा ?

रोहित शर्मा ट्विट करत म्हणाला की, जेव्हा आपण एकजुटीनं उभं असतो तेव्हा देश कायमच मजबूत राहिला आहे. कठिण प्रसंगात समस्येवर तोडगा काढणं ही पहिली गरज आहे. भारताच्या विकासात कायमच शेतकऱ्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. मला खात्री आहे की, आपण नक्कीच एकजुटीनं यावर तोडगा काढू.

कंगाननं रोहितच्या ट्विटला रिप्लाय देत संताप व्यक्त केला आहे. तिनं सर्वच क्रिकेटपटूंवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाली कंगना ?

कंगना म्हणाली की, हे सर्व क्रिकेटपटू धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का अशा स्वरूपात बोलत आहेत. शेतकरी त्यांच्याच भल्यासाठी करण्यात आलेल्या कृषी कायद्याला विरोध का करतील. हे दहशतवादी आहेत जे गोंधळ घालत आहेत. दहशतवादी म्हणा की, भीती वाटत आहे का ? असा सवालही तिनं केला आहे.

कंगनाचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी हे ट्विट शेअर देखील केलं आहे. सध्या सोशल मीडियावर तिच्या ट्विटची खूप चर्चा सुरू आहे.