Kangana Ranaut | कंगना राणावत पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात ! महात्मा गांधी यांच्याबाबत म्हणाली…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. यामुळे ती सतत ट्रोल देखील होत असते. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने ‘भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले नसून 2014 मिळाले असल्याचं’ म्हटलं होतं. त्यावरून अनेकांनी तिला धारेवर धरलं होतं. अशातच तिने (Kangana Ranaut) पुन्हा एकदा नवीन वादाला आमंत्रण दिलं आहे.

 

कंगना राणावतने (Kangana Ranaut) महात्मा गांधीजींवर (Mahatma Gandhi) आरोप केले आहेत. महात्मा गांधींनी सुभाषचंद्र बोस (Subhashchandra Bose) आणि भगत सिंग (Bhagat singh) यांचे कधीच समर्थन केले नसल्याचं कंगना राणावत हिने म्हटलं आहे. तसेच महात्मा गांधींच्या अहिंसा मंत्राची देखील तिने खिल्ली उडवली आहे. यावेळी दुसरा गाल पुढे केल्याने भीक मिळते स्वातंत्र्य (Independence) नाही, असं वक्तव्य कंगनाने केलं आहे.

 

कंगनाने एक बातमी शेअर केली आहे. यामध्ये गांधी अन्य नेत्यांना ब्रिटिशांच्या (British) हवाली करण्यास सहमत झाले असल्याचं म्हटलं आहे. या अहवालात केलेल्या दाव्यानुसार महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू (Jawaharlaal Nehru) आणि मोहम्मद अली (Mohammad Ali Jinna) जिना हे एका ब्रिटीश न्यायाधीशासोबत शामिल होते. त्यांच्यानुसार सुभाष चंद्र बोस भारतात परतल्यानंतर बोस यांना ब्रिटीशांच्या हवाली करण्यात येणार होतं. यावर कमेंट करत कंगनाने एक तर तुम्ही गांधीचे प्रशंसक आहात किंवा नेताजीचे समर्थक, म्हटलं आहे. त्यामुळे दोन्हीपैकी एक काहीतरी निवडा, असे तिने म्हटले आहे.

याबाबत बोलताना कंगनाने (Kangana Ranaut) आणखीन पोस्ट मध्ये लिहिले आहे की,
ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला त्यांना अशा लोकांच्या स्वाधीन केले, ज्यांच्यात दडपशाहीची,
लढण्याची हिम्मत नव्हती किंवा ज्यांचे रक्त सळसळत नव्हते मात्र धूर्त आणि सत्तेचे भूखे (Hunger Of Power) होते.
तसेच कंगनाने महात्मा गांधी वर निशाणा साधत असा दावा केला आहे की,
महात्मा गांधी भगतसिंग यांना फाशी देण्यास इच्छुक असल्याचा पुरावा आहे.
तर कंगनाच्या या वक्तव्यामुळे जयपुर मध्ये तिच्याविरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली आहे.

 

Web Title :- Kangana Ranaut | celebs kangana ranaut controversial remarks on mahatma gandhi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MPSC Exam | 20 नोव्हेंबरला असणार्‍या सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र, मार्गदर्शक सूचना जारी

Dr. Bhagwat Karad | विमानातील प्रोटोकॉल तोडत महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्याने वाचवले प्रवाशाचे प्राण; पीएम मोदींनी दिली शब्बासकी

Pune Crime | रेल्वेत नोकरी लावण्याच्या बहाण्यानं 8.5 लाखांची फसवणूक; पुण्यातील महिला टीसी अधिकाऱ्याला अटक