सतत पंगा घेणार्‍या कंगना राणावतची टिवटिव सुरूच, म्हणाली – ‘लोकांनी बॉलिवूड हा शब्दच रिजेक्ट करावा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – फिल्म इंडस्ट्रीत आपल्या कामाने वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री कंगना रणौत गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडिियावर वादग्रस्त विधान करून चर्चेत राहत आहे. तिने पुन्हा एकदा बॉलीवूडवर हल्ला चढवला आहे. तिने बॉलीवूड या नावाला टार्गेट करून ट्विट केल आहे. तिला फिल्म इंडस्ट्रीला बॉलीवूड म्हणणच पसंत नाही. नुकतेच तीने ट्विटरवर एक नवा हॅशटॅग India Reject Bollywood सुरु केला आहे. कंगनाने सुरु केलेल्या या मोहिमेला ट्विट्रवरून अनेकांचा प्रतिसाद मिळत आहे.

कंगना म्हणते बॉलीवूड हा शब्द अपमानजनक आहे. त्यामुळे लोकांनी हा शब्दच रिजेक्ट करावा.इथे कलाकारही आहेत अन् भांडणारे लोकही आहेत. ही इंडियन फिल्म इंडस्ट्री अाहे. तसेच इथे बॉलीवूडही आहे. India reject bollywood हा हास्यास्पद शब्द बॉलीवूड हा शब्द हॉलीवूडमधून काफी केलेला असल्याचे कंगनाने ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान यापूर्वीही तिने नेपोटीज्म आणि मुव्ही माफियासारखे हॅशटॅग प्रसिध्द केले होते. कंगनाने नुकतच थलाईवीचे शेड्युल्ड पुर्ण केले आहे. त्यामुळे ती च्या घरी मनालीत परतली आहे. तसेच ती तीच्या आगामी तेजस आणि धाकड चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या तयारीत आहे. कंगनाचा हा नवा हॅशटॅग चाहत्यामध्ये की पॉप्युलर होतोय हे पाहण महत्वाच ठरणार आहे.

दिग्गजावर तोंडसुख
कंगनाने मिडियाहाऊस विरोधात न्यायालयात जाणार्या बॉलीवूड दिग्गजावर तोंडसुख घेतले आहे. बॉलीवूूूडमधील लांडगे वृत्तमाध्यमाविरोधात एकत्र आले अशी टिकाने तिने केली आहे

You might also like