जयललितांच्या लूकमध्ये दिसली कंगना रनौत, फोटो झाले व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरुन महाराष्ट्र सरकारवर सातत्याने टीका करणारी अभिनेत्री कंगना रानौत(kangana ranaut)आता नवीन कारणाने चर्चेत आली आहे. तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावर बनत असलेल्या ‘थलायवी’ सिनेमाच्या शूटिंग मध्ये कंगना बिझी असून सगळीकडे या सिनेमाची चर्चा सुरु आहे. या सिनेमात जयललिता यांच्या लहानपणापासून ते तामिळनाडूच्या मुख्यमंत्री बनण्यापर्यंतचा जीवनप्रवास दाखवण्यात येणार आहे.

हा सिनेमा कंगनाच्या महत्वाकांक्षी प्रोजेक्टपैकी एक समजला जातो. कंगनाने थलायवीच्या सेटवरील काही फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. त्यात ती जबरदस्त लूकमध्ये दिसून येत असून, समाज माध्यमात हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ट्विटमध्ये कंगनाने लिहले की, “जय मां यांच्या आशिर्वादाने थलायवीचं आणखी एक शेड्युल पूर्ण झालं आहे. कोरोनाच्या या काळात भरपूर काही बदलेले आहे. मात्र, ऍक्शन आणि कटमध्ये काहीही बदलेलं नाही. संपूर्ण टीमचे आभार.”

या फोटोंमध्ये कंगना सेम टू सेम जयललिता यांच्या सारखी दिसत आहे. तिचा मेकअप अशा अंदाजात करण्यात आला आहे की, लूक जयललिता यांच्या सारखा प्रभावी दिसून येतोय. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शूटिंगसाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. म्हणून परिस्थिती सामान्य होई पर्यंत वाट पाहण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. कारण एका क्लायमॅक्स सिनकरता जवळपास ३५० लोकांची गरज भासते.