Kangana Ranaut | अभिनेत्री कंगणाच्या अडचणीत वाढ; अखेर मुंबईत ‘FIR’ दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Kangana Ranaut | बॉलिवूड अभिनेत्री कंगणा रणौत (Kangana Ranaut) ही अनेक वादग्रस्त मुद्यावरुन चर्चेत असते. नुकतंच कंगणाने देशाबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. त्यावरून देशभर कंगणावर टीका करण्यात येत आहे. असं असतानाच आता तिने शीख समाजाच्या (Sikh community) भावना भडकवणारी पोस्ट सोशल मिडियावर शेअर केली आहे. यामुळे कंगणाविरुद्ध खार पोलीस ठाण्यात (Khar police station) अखेर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

शीख समाजाने कंगणा विरोधात खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. शीख समाजाच्या भावना भडकवणारी पोस्ट सोशल मिडियावर केल्याप्रकरणी शीख समाजाच्या वतीने ही तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार अभिनेत्री कंगणा रणौतवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अभिनेत्री कंगणाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शीख समुदायाविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केली होती.
त्यांनतर हा वाद आणखी वाढला होता.
दिल्लीतील शीख गुरुद्वारा व्यवस्थापनाने कंगनाच्या इन्स्टाग्राम पोस्टवर शीखांसाठी वापरण्यात आलेल्या
भाषा आणि विचारांवर नाराजी व्यक्त केली होती. वास्तविक कंगनाने किसान आंदोलनाचे वर्णन खलिस्तानी आंदोलन असे केले होते.

 

Web Title :- Kangana Ranaut | fir against the bollywood actress kangana ranaut in Khar police station sikh community in india mumbai marathi news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा