‘या’ चित्रपटात अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसणार अभिनेत्री ‘कंगना रणौत’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौतचा आगामी चित्रपट ‘धाकड’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट एक अ‍ॅक्शन थ्रिलर असणार आहे. या चित्रपटामध्ये कंगना एका वेगळ्या अवतारात दिसणार आहे. या चित्रपटाला रजनीश रेजी घई डायरेक्ट करत आहे. काही दिवसांपुर्वी कंगनाने या चित्रपटाचे टायटल सांगितले होते.

चित्रपटाबद्दल सांगताना अभिनेत्री कंगना म्हणाली की, ‘हा चित्रपट केवळ माझ्या करिअरचा प्रवास नसून पुर्ण भारताच्या सिनेमांचा प्रवास आहे. हा बॉलिवूडचा पहिला आणि महिला-प्रधान अ‍ॅक्शन चित्रपट आहे. हा चित्रपट मोठ्या प्रमाणात तयार केला जात आहे आणि याला फेस्टिवल सीजनमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. जर हा चित्रपट यशस्वी ठरला तर महिलांना कधीच मागे वळून बघण्याची किंवा मागे फिरण्याची गरज पडणार नाही. हा चित्रपट आमचा ड्रिम प्रोजेक्ट आहे. मी यामध्ये काम करण्यासाठी वाट पाहू शकत नाही.’

या चित्रपटासोबत ‘कहाणी’ आणि ‘पिंक’ सारख्या चित्रपटांचे स्क्रिनसायटर रितेश शाह पहिल्यांदाच कंगना रणौतसोबत काम करणार आहे. चित्रपटाबद्दल डायरेक्टर रेजी यांनी सांगितले की, ते अभिनेता म्हणून कंगनाकडे प्रगतीच्या दिशेने पाहत आहे. त्यांना असे वाटते की, कंगना या चित्रपटासाठी परफेक्ट आहे.

हा चित्रपट फिमेल हिरो असणारा अ‍ॅक्शन चित्रपट असणार आहे. चित्रपटाची टिम एका मोठ्या हॉलिवूड अ‍ॅक्शन डायरेक्टर यांची मदत घेण्याचा विचार करत आहे. चित्रपटाची शूटिंग भारत व्यतिरिक्त साउथ ईस्ट एशिया, मिडिल ईस्ट आणि यूरोपमध्ये केले जाणार आहे. हा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे.

सिनेजगत बातम्या
सौंदर्यामुळे नव्हे तर ‘या’ ४ चित्रपटामुळे बदलले खा. अभिनेत्री नुसरत जहॉंची ‘लाईफ’
Video : प्रभासच्या साहोमधील पहिल्या गाण्याचा टीजर ‘आउट’ ; पहा प्रभास आणि श्रद्धाची ‘हॉट’ केमिस्ट्री

पॉर्न वेबसाईट, ‘तो’ युवक आणि ३०० युवती ; प्रकार पाहून पोलिस झाले ‘हैराण-परेशान’

मौनी रॉयच्या ‘त्या’ गाण्यावरील मोनालिसाचा ‘हटके’ डान्स !

Video : एकता कपूर पिंक कलरच्या ड्रेसमध्ये दिसली एकदम ‘हॉट’; बॉलिवूडबद्दल म्हणाली…

सोशल मीडियावर हिट अभिनेत्री कनक पांडेचा ‘वेस्टर्न’ लुक !

शूटिंग दरम्यान भाजली ‘ही’ अभिनेत्री

अभिनेत्री रानी चॅटर्जीचा १० वर्षांपूर्वीचा ‘तो’ फोटो व्हायरल !

‘बेबी डॉल’ सनी लिओनीच्या ‘त्या’ फोटोंनी सोशलचे वातावरण ‘गरम’

World Kiss Day : ‘या’ 5 चित्रपटांच्या पोस्टरवर किसिंन सीन, ‘या’ सिनेम्यात तब्बल 23 वेळा झाला ‘लिप लॉक’

प्रियंकासह बॉलिवूडमधील ‘या’ ३ अभिनेत्री कोट्याधीश ; जगतात ‘राजेशाही’ आयुष्य !

अभिनेत्री कंगना रणौतची बहिण रंगोलीने साधला दीपिका पादुकोणवर ‘निशाणा’ !

दुबईच्या प्रशासकाची ‘राणी’ २७१ कोटी घेवून ब्रिटीश ‘बॉडीगार्ड’सह पळून गेल्याचं उघड ; लंडनमध्ये करतेय ‘मौज’

 

Loading...
You might also like