कंगनाने डिलिट केलेले ‘ते’ ट्विट व्हायरल, शेतकरी आंदोलनातील वयोवृध्द आजीची उडवली खिल्ली

पोलीसनामा ऑनलाईन – वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री (Kangana Ranaut) कंगना राणावत तिच्या एका ट्विटमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण तिने सत्य न जाणून घेता शेतकरी आंदोलनातील एका फेक ट्विटला रिट्विट केले होते. ट्रोल झाल्यावर कंगनाने हे ट्विट डिलीट केले आहे. मात्र अनेकांनी याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवला असल्याने आता तिला पुन्हा ट्रोल केले जात आहे.

अभिनेत्री कंगनाने जे ट्विट रिट्विट केले होते. त्यात शेतकरी आंदोलनात सहभागी वयोवृद्ध शेतकरी आजी शाहीन बागची बिलकिस बानो असल्याचे सांगितले जात होते. यात लिहिले होते की, आजीकडून हे काम करून घेतले जात आहे. कंगनाने लिहिले होते की, हा हा ही तिच आजी आहे जिला टाइम्स मॅगझीनने भारतातील सर्वात पॉवरफुल लोकांमध्ये सहभागी केले होते. ती 100 रूपयात अव्हेलेबल आहे. पाकिस्तानातील पत्रकारांनी इंटरनॅशनल पीआरला भारतासाठी हायर केले आहे. आपल्याला असे लोक हवेत जे आपल्यासाठी इंटरनॅशनली आवाज उठवू शकतील.

ट्रोल होताच डिलीट केले ट्विट
कंगनाचे हे ट्विट येताच सोशल मीडिया यूजर्सनी तिला ट्रोल करणे सुरु केल होते. तेव्हा कंगनाने ट्विट डिलीट केले होते. यानंतरही एका यूजरच्या पोस्टवर तिने लिहले की, जास्त एक्सायटेड होत आहे जास्त एक्साइटमेंट तुमच्यासारख्या जयचंदसाठी चांगले नाही. ही फेक न्यूज नाही. माझे सोर्स अजूनही मी व्हेरिफाय करत आहेत. यावर यूजरने तिला विचारले की, तुझे सोर्स कोण आहे?

कोण आहे बिलकिस बानो ?
बिलकिस बानो (82 ) जिला शाहीन बाग दादीही म्हटले जाते. त्या CAA-NRC प्रोटेस्टचा चेहरा बनली होती. हजारो शेतकरी केंद्राच्या कृषी बिलाला विरोध करत आहे. या विरोध प्रदर्शनात वयोवृद्ध आजीचे फोटो समोर आले होते. कंगनाने दोन्ही एकच असल्याचे सांगितले होते.

You might also like