… अशा अनोख्या पद्धतीने कंगना करणार वाढदिवस साजरा  

मुंबई : वृत्तसंस्था – बॉलिवूडची ‘मणिकर्णिका’ अभिनेत्री कंगना रनौत आपल्या बेधडक वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहे. नेहमी काहीतरी खळबळ जनक वक्तव्य करणारी कंगना यंदाचा आपला बर्थडे अनोख्या पद्धतीने सेलिब्रेट करणार आहे. दहा दिवस मौनव्रत पाळून कंगना आपला वाढदिवस साजरा करणार आहे.

येत्या २३ मार्चला कंगनाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त कंगना कोइंबतूर इथल्या एका आश्रममध्ये दहा दिवस योग आणि ध्यानसाधना करणार असल्याचं समजतंय. दहा दिवसांच्या कॅम्पनंतर ती तिच्या घरी मनालीला जाणार असून मनालीत कुटुंबीयांसोबत ती तिचा वाढदिवस साजरा करणार आहे. गेल्या वर्षीसुद्धा कंगनाने तिचा वाढदिवस कुटुंबीयांसोबत वेळ घालवत साजरा केला होता.

याबद्दल एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत कंगना म्हणाली, ‘मी १६-१७ वर्षांची असल्यापासून योगसाधना करते. कोइंबतूरमध्ये जो कोर्स होणार आहे ती थोडी पुढची पायरी आहे. तो कोर्स करण्याची माझी खूप इच्छा होती आणि नेमकं माझ्या वाढदिवसाच्या तारखांमध्ये ते जुळून आलं. दहा दिवस मौन पाळणं आव्हानात्मक असेल. पण ही मी स्वत:ला वाढदिवशी दिलेली अमूल्य भेट असेल.’