कंगना आणि महेश भटच्या ‘त्या’ व्हायरल फोटोमुळं खळबळ ! ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत म्हणाली…

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर लोकांनी नेपोटीजम आणि इतर मुद्द्यांवरून डायरेक्टर महेश भट यांच्यावर निशाणा साधला होता. रिया चक्रवर्ती आणि महेश यांचे काही फोटोही समोर आले होते. यानंतरही भट यांच्यावर टीका झाली होती. आता कंगना रणौत आणि महेश यांचा एक फोटो समोर आला आहे. इतकंच नाही तर अभिनेत्री राखी सावंत हिनं यावरून आता कंगनावर निशाणा साधला आहे. कंगना आणि महेश यांचा हा फोटो राखीनंच शेअर केला आहे. हा फोटो सध्या सोशलवर व्हायरल होत आहे. याआधीही राखी कंगनाला चक्क भिकारी म्हणाली होती. इतकंच नाही तर राखीनं कंगनाच्या मुंबईबद्दलच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता. तिचे व्हिडीओ देखील समोर आले होते.

राखी सावंत हिनं तिच्या इंस्टावरून कंगना रणौत आणि महेश भट यांचा एक फोटो शेअर केला आहे. यात कंगना आणि महेश खूप कॅज्युअली आणि जवळ बसल्याचं दिसत आहे. कंगनानं ब्लू वनपीस घातला आहे. फोटो शेअर करताना राखी म्हणते, सुशांत केसमध्ये नवीन वळण आलं आहे. यात तिनं हसण्याचीही इमोजी वापरली आहे.

View this post on Instagram

Sushant ke case me naya mode aaya😂😂😂😂

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

याआधीही राखीनं तिच्या इंस्टावरून व्हिडीओ शेअर करत कंगनावर निशाणा साधला होता. यात तिनं कंगनाला भिकारी म्हटलं होतं. राखी म्हणाली होती की, कंगनानं तिच्या हिमाचलमधील घरीच राहायला हवं होतं. मुंबईबद्दल वक्तव्य केल्यानंतर जेव्हा कंगना पुन्हा मुंबईत अली होती तेव्हा राखीनं कंगनावर निशाणा साधला होता.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like