लग्नाआधी शारीरिक संबंधांवरून कंगना रणौत आणि यूजरमध्ये वाद ! अभिनेत्री म्हणाली…

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार कंगना रणौत (Kangana Ranaut) आपल्या बिंधास्त वक्तव्यांसाठी ओळखली जाते. यासाठी काही वेळी तिला ट्रोलही केलं जातं. परंतु तीदेखील जशास तसं उत्तर देत असते.

अलीकडेच्या कंगनाच्या एका पोस्टवर एका सोशल मीडिया यूजरनं लिहिलं की, विवाहपूर्व शारीरिक संबंध संस्कारी बाब नाही. तुम्ही सनातन धर्माच्या विरोधात आहात. यावरून कंगनानं त्या यूजरला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

कंगनानं त्या यूजरला उत्तर देताना लिहिलं की, नाही नाही मी हॉट आणि सेक्सी आहे, मला याची गरज नाही. कंगनाच्या उत्तरावरून तिला जोरदार ट्रोल केलं गेलं. यानंतर कंगनानंही जशास तसं उत्तर दिलं आहे.

एका यूजरला उत्तर देताना कंगना म्हणते, जशा प्रकारे हे सर्व डिप्रेस आणि आत्मघाती नारीवादी विवाहपूर्व शारीरिक संबंधांबाबत वादविवाद करत आहेत हे पाहून मजा येत आहे. यातील काही लोक तर यावरून चिखलफेक करत आहेत की, पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित व्यक्तीसोबत शारीरिक संबंध आहेत.

कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती पंगा सिनेमात दिसली होती. लवकरच ती आगामी सिनेमा थलायवीमध्ये दिसणार आहे. तमिळनाडूच्या राजकारणातील एक मोठं नाव तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या बायोपिकमध्ये जयललिता यांची भूमिका कंगना साकारणार आहे. याशिवाय ती तेजस आणि धाकड या सिनेमातही काम करताना दिसणार आहे.

You might also like