×
Homeताज्या बातम्याKangana Ranaut On Tabu - Drishyam 2 | 'दृश्यम 2'मधील तब्बूविषयी कंगनाचं...

Kangana Ranaut On Tabu – Drishyam 2 | ‘दृश्यम 2’मधील तब्बूविषयी कंगनाचं मोठं वक्तव्य; पोस्ट व्हायरल

पोलीसनामा ऑनलाईन : Kangana Ranaut On Tabu – Drishyam 2 | बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) नेहमीच तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत असते. पुन्हा एकदा कंगना अभिनेत्री तब्बू (Tabu) बद्दल केलेल्या वक्त्यामुळे ती चर्चेत आहे. अभिनेत्री तब्बूचा ‘दृश्यम- 2’ (Drishyam 2) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) धुमाकूळ घालत आहे. मध्यंतरी बॉलीवूडचे चित्रपट एकामागून एक फ्लॉप होत असताना ‘दृश्यम-2’ ने बॉक्स ऑफिसवर डंका आहे. जणू दृश्यम 2 हा सिनेमा बॉलीवूडला तारणार असेच दिसत आहे. या चित्रपटातील सगळ्याच कलाकारांच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तर यात कंगना राणौतनेही तब्बूचे तोंड भरून कौतुक केले आहे. तर तिने तब्बूला हिंदी चित्रपट सृष्टीला तारणारा सुपरस्टार असे देखील संबोधले आहे. यावर्षी बॉलिवूडचे ‘भूल भुलैया 2’ (Bhool Bhulaiyaa 2) आणि ‘दृश्यम 2’ हे दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले आहेत. या दोन्ही चित्रपटांमध्ये अभिनेत्री तब्बू ने उत्तम असे अभिनय करून चाहत्यांची मने जिंकली. (Kangana Ranaut On Tabu – Drishyam 2)

कंगनाने (Kangana Ranaut) तब्बूचे (Tabu) कौतुक करत तिच्या instagram अकाउंट वर स्टोरी शेअर केली आहे. यात तिने म्हटले आहे की, “ही एक अभिनेत्री जी 50 वर्षांचा टप्पा ओलांडूनही एकटीच हिंदी चित्रपट सृष्टीला वाचवत आहे. तिच्या प्रतिभा आणि सातत्य यावर कधीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकत नाहीत. तब्बू माझ्यासाठी एक प्रेरणा आहे. मला वाटते की महिलांना त्यांच्या कामाबद्दल त्यांचे अधिक श्रेय दिले पाहिजे. त्या खरोखरच एक प्रेरणा आहेत.” अशा शब्दात कंगनाने तब्बूचे कौतुक केले. (Kangana Ranaut On Tabu – Drishyam 2)

‘दृश्यम 2’ (Drishyam 2) या चित्रपटाआधी तब्बू ‘भूल भुलैया 2’ (Bhool Bhulaiyaa 2) या चित्रपटात
देखील दिसली होती. हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.
या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 14 कोटींचा व्यवसाय केला होता.
तर बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने एकूण 185.92 कोटींचा व्यवसाय केला होता.
या चित्रपटात तब्बू (Tabu) सोबत कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani)
यांच्या प्रमुख भूमिका होत्या. तर आता ‘दृश्यम 2’ मध्ये तब्बू (Tabu) ही अजय देवगन, (Ajay Devgn)
श्रीया सरन (Shriya Saran),अक्षय खन्ना (Akshaye Khanna) आणि इशिता दत्ता (Ishita Dutta)
यांच्यासोबत दिसत आहे. 18 नोव्हेंबरला रिलीज झालेला हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
या चित्रपटाने दोन दिवसात 37.7 कोटींची कमाई केली आहे.
दृश्यम 2 हा याच नावाने मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे. तो 2021 मध्ये प्रदर्शित झाला होता.
दृश्यम 2 हा चित्रपट पहिल्याच आठवड्यात शंभर कोटींचा टप्पा पार करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Web Title :- Kangana Ranaut |kangana ranaut called 52 year old tabu a superstar said she is saving bollywood alone entertainment News

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News