Kangana Ranaut | कंगना रणावतच्या आयुष्यात कोण ‘खास’ची एन्ट्री, शेअर केली रोमँटिक पोस्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Kangana Ranaut | बाॅलिवूड अभिनेत्री कंगना रणावत (Kangana Ranaut) हिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक रोमँटिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टवरुन तिच्या आयुष्यात कोणीतरी खास (Special) व्यक्ती आल्याचा अंदाज लावण्यात येत आहे. कंगनाने शेअर केलेल्या स्टोरीवर तिने अतिशय रोमँटिक असं कॅप्शन देखील दिलं आहे.

 

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असणाऱ्या कंगनावर सध्या अनेक ठिकाणाहून गुन्हे नोंदवण्यात आले आहे.
मोदी सरकारने तिन्ही कृषी कायदे माघारी घेतल्यामुळे संतापलेल्या कंगनाने पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्यांनी वादाला आमंत्रण दिलं होतं.
त्यानंतर तिच्यावर सिख समुदायबाबत अपमानजनक वक्तव्य केल्याचा देखील गुन्हा आहे.

https://www.instagram.com/stories/kanganaranaut/2717360871337683029/?hl=hi

 

कंगनाने शेअर केलेल्या स्टोरीमध्ये एका मुलाने एका मुलीला मिठ्ठी (Hug) मारली आहे.
तर त्या खाली ‘तेरे लिए हम है जिए… कितने सितम हम पे सनम…’ असं कॅप्शन दिलं आहे.
तसेच तिने दुसऱ्या स्टोरीला तिचा लहानपणीचा (Childhood) फोटो शेअर केला आहे.
यावेळी ‘मी एक सामन्य मुलगी आहे, माझ्यात विशेष असं काही नसून मी फक्त प्रेमात विश्वास ठेवते आणि हेच मला सुंदर जगाशी भेटवतं’, असं कॅप्शन दिलं आहे.

 

कंगना रणावतच्या (Kangana Ranaut) या पोस्ट्सवरुन तिच्या आयुष्यात कोणीतरी खास आलं असल्याचं म्हटलं जात आहे.
तसेच तिला पुन्हा एकदा प्रेमावर विश्वास होत असल्याचं देखील यातून दिसून येत आहे.
याआधी कंगना रणावतचं नाव अनेकांनासोबत जोडण्यात आलं आहे.
एकेकाळी कंगना प्रसिद्ध बाॅलिवूड अभिनेता ह्रतिक रोशनला (Hrithik Roshan) डेट करत असल्याचं समोर आलं होत.
तसेच अदित्य पंचोळी (Aditya Pancholi), अध्ययन सुमन (Adhyayan Suman) यांना देखील कंगनाने डेट केलं असल्याचं समोर आलं होतं.

कंगनाचे नाव अनेकांसोबत जरी जोडले गेले असले तरी कंगना ह्रतिकवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नाही.
याआधी देखील ‘आप की आदालत’ (Aap Ki Adalat) मध्ये कंगनाने ह्रतिकवर अनेक गंभीर आरोप केले होते. तर ते सर्व आरोप खोटे असल्याचं ह्रतिकचं म्हणं आहे.

 

Web Title : Kangana Ranaut | kangana ranaut shares a picture on instagram on a romantic note

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Parambir Singh and Sachin Vaze | परमबीर आणि वाझे यांच्यात त्यावेळी केबिनमध्ये तासभर चर्चा; मुंबई पोलिस चौकशी करणार

TV खरेदीसाठी जाताय का? ‘या’ 5 गोष्टी आवश्य पाहून घ्या, अन्यथा नंतर वाढू शकते चिंता!

Maharashtra Cabinet Decision | महानगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांसाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ