पोलीसनामा ऑनलाईन : Kangana Ranaut | बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक म्हणून सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीला ओळखलं जातं. सिद्धार्थ-कियाराची पहिली भेट ही ‘लस्ट स्टोरीज’ या चित्रपटानिमित्त आयोजित केलेल्या एका पार्टीत झाली. त्यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. ‘शेरशाह’ चित्रपटाच्या सेटवर दोघे एकमेकांच्या जवळ आले होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. आणि त्यांची जोडीसुद्धा प्रचंड लोकप्रिय झाली होती. (Kangana Ranaut)
या चित्रपटानंतर कियारा आणि सिद्धार्थ एकमेकांना डेट करु लागले होते. या दोघांच्या लग्नाच्या चर्चा मागच्या काही काळापासून होताना दिसत होत्या. आता अखेर ६ फेब्रुवारी रोजी ते लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाच्या बातमीने फक्त त्यांचे चाहतेच नाही तर बॉलिवूड कलाकारही आनंदी झाले आहेत. यानिमित्त अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) या दोघांसाठी एक खास संदेश लिहित त्यांच्याबद्दलचं प्रेम व्यक्त केलं आहे.
कंगनाने सिद्धार्थ आणि कियारा यांचा एक छोटासा व्हिडीओ तिच्या सोशल अकाऊंटवरून पोस्ट करत “हे जोडपं किती आनंददायी आहे. सिनेसृष्टीत असं खरं प्रेम क्वचितच पाहायला मिळतं. ही दोघं एकत्र खूप छान दिसतात.” असं लिहिलं आहे. तिच्या या पोस्टने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नापूर्वीचे कार्यक्रम, लग्न आणि लग्नानंतरचं रिसेप्शन हे 5 फेब्रुवारीपासून ते 8 फेब्रुवारीपर्यंत पार पडणार आहेत. या दोघांच्या विवाहस्थळाविषयीही जोरदार चर्चा सुरू आहे. सिद्धार्थ आणि कियारा हे जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये विवाहबंधनात अडकणार असल्याचं कळतंय. या लग्नसोहळ्यासाठी 100 ते 125 पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. यामध्ये बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांचाही समावेश आहे.
Web Title :- Kangana Ranaut | kangana ranaut wrote a special post for siddharth malhotra and kiara advani
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update