कंगनाचा आता ट्विटरला रामराम ! ट्विटर आता तुझी वेळ संपली आहे असं म्हणत केल ट्विट

पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या अनेक महिन्यात चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना राणौत ही अनेक विषयावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करत असते. तर अनेक मुद्यावर ती बोलत असते. आणि तेही ट्विटर या माध्यमावर, आणि ती ट्रोलही होते. याबाबत आता एक महत्वाची माहिती समोर आली आहे. की, ट्विटरवर व्यक्त होणारी कंगना आता ट्विटरला रामराम ठोकणार आहे. ट्विटर बंद करणार असल्याची अशी ट्विटरवरूनच माहिती स्वतः तिनेच दिली आहे.
https://twitter.com/KanganaTeam/status/1359450551126269952.

 

कंगना राणोत ही सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर तिचे प्रत्येक ट्विट चर्चेत होते. तर महाराष्ट्र सरकारसोबत तिचा वाद, बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण, आणि आता शेतकरी आंदोलनावर तीनं ट्विट केलं आहे. या दरम्यान तिच्या अनेक ट्विट मुळे वादही झाले आहेत. आता मात्र कंगनाची ही टिवटिव थांबणार आहे. तसेच ट्विटर आता तुझी वेळ संपली आहे. आता Koo App वर शिफ्ट होण्याची वेळ आली आहे. मी लवकरच माझे अकाउंट डिटेल्स शेअर करेन. स्वदेशी #kooapp चा अनुभव घेण्यासाठी खूपच उत्सुक आहे,’ असे ट्विट कंगनाने केले आहे.

दरम्यान, कंगनाचे ट्विटरवर ३० लाखांवर फॉलोअर्स आहेत. कंगनाच्या आता या निर्णयाने फॉलोअर्स निराश होणार आहेत. काही दिवसांपूर्वीच दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर कंगनाच्या अव्यवस्थित ट्विटवर ट्विटरने कारवाई केली होती. आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी व पॉपस्टार रिहानाने शेतकरी आंदोलनाला पाठींबा देत ट्विट केले होते. तिच्या या ट्विटला विरोध करत कंगनाने ट्विटचा फटाका केला होता. तसेच तिने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी दहशतवादी म्हटले होते. यानंतर ट्विटरने कारवाई करत तिचे काही वादग्रस्त ट्विट डिलीट केले होते. कंपनीच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे कारण ट्विटरने दिले होते.