महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट हवीये-कंगनाचे नवे ट्विट

पोलिसनामा ऑनलाईन – अभिनेत्री कंगना रणौतने पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीका केली आहे.तिने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात एक ट्विट करीत तिने राज्य सरकारचा उल्लेख फॅसिस्ट सरकार केला आहे.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून बॉलिवूड कलाकारांवर निशाणा साधणार्‍या अभिनेत्री कंगनाने मुंबई पोलिसांविषयी वादग्रस्त ट्विट केले होते. त्यामुळे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनीही कंगनाला सुनावले होते. त्यानंतर तिने मुंबईची तुलना थेट पाकव्याप्त काश्मिरशी केली होती. सध्या कंगना हिमाचल प्रदेशातील घरी असून, अजूनही हा वाद शमला नाही. तिने आणखी एक ट्विट करत महाराष्ट्र सरकारला लक्ष्य केले आहे. कोरोना महामारीमुळे महाराष्ट्रातील गंभीर परिस्थिती अजूनही कायम आहे. रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे, पण फॅसिस्ट सरकार त्यांच्या विरोधात बोलणार्‍या लोकांना त्रास देण्यात व्यस्त आहे. आम्हाला महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट हवी आहे. फॅसिझम थांबवा, असे ट्विट करत कंगणाने राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like