Kangana Ranaut-Mandi Lok Sabha | कंगना रनौतला भाजपकडून उमेदवारी जाहीर, सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाली…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Kangana Ranaut-Mandi Lok Sabha | अभिनेत्री कंगना रानौतला भाजपाने (BJP) लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी या लोकसभा मतदारसंघातून कंगना लोकसभा निवडणूक लढवणार आहे. अनेक दिवसांपासून कंगनाच्या उमेदवारीची चर्चा होती. अखेर तिच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.

हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून कंगनाला उमेदवारी मिळाली आहे. मंडी हे तिचे मूळगाव आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कंगनाने सोशल मीडियावर पोस्ट करून भाजप श्रेष्ठींचे आभार मानले आहेत.(Kangana Ranaut-Mandi Lok Sabha)

कंगनाने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले ओ की, माझा नेहमीच भाजपला बिनशर्त पाठिंबा राहिला आहे. भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने आज मला माझ्या जन्मभूमी हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदारसंघातून लोकसभा उमेदवार म्हणून घोषित केले आहे. लोकसभा निवडणूक लढविण्याबाबतचा निर्णय घेतला. त्याबद्दल आभार.

अधिकृतपणे भाजपमध्ये सामील झाल्याबद्दल मला सन्मान आणि आनंद वाटत आहे. मी एक योग्य कार्यकर्ता आणि एक विश्वासार्ह लोकसेवक होण्यासाठी मी उत्सुक आहे. मनापासून आभार, असे कंगनाने म्हटले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Ravindra Dhangekar On Muralidhar Mohol | ‘मोहोळ यांनी पहिलवानांना कधी अर्धा लिटर दूध दिले नाही; बिल्डरांना मात्र पाजले’ – रवींद्र धंगेकर (Videos)

Lok Sabha Election 2024 | भाजपाकडून एकनाथ शिंदेंची कोंडी? पाच खासदारांचे तिकीट कापणार? संजय शिरसाट म्हणाले…