‘या’ कारणामुळे कंगनाचा रणौतचा ‘मेंटल है क्या’ वादाच्या भोवऱ्यात… सेन्सॉर बोर्डाला ‘या’ संस्थेचे पत्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री कंगना रणौत आणि अभिनेता राजकुमार राव यांची प्रमुख भूमिका असलेला सिनेमा मेंटल है क्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सिनेमाच्या नाववरून वाद सुरु झाला आहे. भारतीय मनोचिकित्सा संस्थेने सिनेमाच्या टायटलवर आक्षेप घेतला आहे. निर्मात्यांनी या सिनेमाचं नाव बदलावं अशी मागणी त्या संस्थेने केली आहे. जे मानसिक आरोग्याच्या समस्यांना तोंड देतात त्यांच्यासाठी या सिनेमाचे नाव हे भेदभाव करणारे आणि हिणवणारे आहे अशी तक्रार त्या संस्थेने केली आहे.

भारतीय मनोचिकित्सा संस्थेने मेंटल है क्या सिनेमाच्या नावावर आक्षेप घेत हे नाव बदलाव अशी मागणी करणारं पत्रच सेन्सॉर बोर्डाला लिहिलं आहे. या पत्रात लिहिलं आहे की, “चित्रपटाच्या नावाला आमचा तीव्र विरोध आहे. मानसिक विकार आणि मानसिक विकारांपासून पीडित असलेल्या लोकांसाठी हे नाव भेदभाव करणारं, अपमानास्पद आणि अमानवीय आहे.” असे या पत्रात म्हटले आहे. इतकेच नाही तर, मनोरुग्णांच्या हक्कांचे उल्लंघन करणारे एखादे दृश्य जर या सिनेमात असेल तर ते सुद्धा काढून टाकावे अशीही मागणी या संस्थेने केली आहे.

https://twitter.com/milantheshrink/status/1119059367498670080/photo/1

कंगना आणि राजकुमार यांचा मेंटल है क्या हा सिनेमा येत्या 21 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी हा सिनेमा मार्चमध्येच प्रदर्शित होणार होता. परंतु असे समजत आहे की, कंगनाने या सिनेमाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा आग्रह केल्याने सिनेमाचे प्रदर्शन पुढे ढकलले आहे अशी चर्चा पाहायला मिळत आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक प्रकाश कोवेलामुदी यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. शैलेश आर. सिंह आणि एकता कपूर यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. हा सिनेमा एक सायकॉलॉजिकल थ्रीलर असावा असा अंदाज आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like