कंगना राणावतच्या अडचणीत भर, जातीय व्देष पसरवल्याच्या आरोपाखाली खटला दाखल करण्याचे आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईच्या वांद्रे न्यायालयाने बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत हीच्याविरूद्ध जातीय द्वेष पसरवल्याबद्दल एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती ज्यामध्ये कंगनाचे ट्वीट भडकवण्याच्या उद्देशाने आहे म्हणून एफआयआर नोंदवण्याची मागणी केली गेली होती. मुन्ना वराली आणि साहिल अशरफ सय्यद यांनी वांद्रे कोर्टात ही याचिका दाखल केली आहे.

या याचिकेत म्हटले आहे की, कंगना रणौत आपल्या ट्विटद्वारे बॉलिवूडमधील हिंदू-मुस्लिम समाजात भांडण निर्माण करण्याचा प्रयत्न करते. याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे की, कंगनाच्या निवेदनातून आणि ट्वीटद्वारे दोन्ही समुदायांमधील द्वेष वाढत आहे. याचिकेत असे म्हटले आहे की, कंगना रणौत बॉलिवूडची बदनामी करण्यासाठी सतत प्रयत्न करत असते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपासून ते टीव्हीपर्यंत कंगना सर्वत्र बॉलिवूडविरूद्ध वक्तृत्व करत आहे. ती बॉलिवूडला सतत नेपोटिज्म आणि फेवरेटिज्मचा अड्डा सांगत आहे.

हे लक्षात घेऊन आज या प्रकरणावर सुनावणी झाली. वांद्रे न्यायालयाने याप्रकरणी कंगनाच्या विरोधात एफआयआर नोंदविण्याचे आदेश दिले आहेत. महत्त्वाचे म्हणजे कंगना नेहमीच तिच्या ट्वीट आणि स्टेटमेन्टवरून वादात असते.

असे म्हटले जाते की, यापूर्वी याचिकाकर्ते वांद्रे पोलिस स्टेशनला पोहचले होते पण पोलिसांनी बॉलिवूड अभिनेत्रीविरूद्ध संज्ञान घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर याचिकाकर्त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली.

पुरावा मिळाल्यावर अटक करण्याची शक्यता
सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्याने कंगनाचे अनेक ट्विट कोर्टासमोर ठेवले. सीआरपीसीच्या कलम 166 (3) च्या अंतर्गत कंगनाविरोधात एफआयआर दाखल केले जाऊ शकते, असे सांगण्यात आले आहे. खटला दाखल झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्रीची चौकशी केली जाईल. यानंतर, जर तिच्याविरूद्ध पुरावा सापडला तर तिला अटक करण्याची शक्यता आहे.