कंगनाचा जया बच्चन यांच्यावर हल्ला, म्हणाली – ‘माझ्या जागी श्वेता अन् सुशांतच्या जागी अभिषेक असता तर तेव्हा देखील हेच बोलाल का’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कंगना रनौत सतत चर्चेत राहते. ती सोशल मिडीयावर सतत आपलं मत व्यक्त करीत आहे. आता तिने एक ट्विट केलं आहे. या ट्विटमुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.

कंगना रनौतने ट्वीट करून म्हटले आहे- ‘जया जी, जर माझ्या जागी तुमची मुलगी श्वेताला टीनएजमध्ये मारहाण करण्यात आली असती, ड्रग देण्यात आलं असतं आणि तिचा विनयभंग केला असता, तेव्हा देखील तुम्ही हीच गोष्ट बोलली असती का? अभिषेकने सतत गुंडगिरी व छळवणूक याची तक्रार करत एक दिवस स्वत:ला लटकवलं असतं तर तुम्ही हे बोलले असते काय? हात जोडून आमच्याबद्दलही करुणा दाखवा.’

खरं तर, समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी राज्यसभेत म्हटलं आहे की मादक पदार्थांनी बॉलिवूडची बदनामी करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. तिच्या वक्तव्यावरच कंगनाने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

जया म्हणाल्या, ‘ही इंडस्ट्री सरकारला मदत करण्यासाठी नेहमी पुढे आली आहे. सरकार कोणतेही चांगली कामं करतं तेव्हा आम्ही समर्थन करतो. जेव्हा कोणतीही अडचण येते तेव्हा फक्त बॉलिवूडचे लोक पैसे देतात. करमणूक उद्योग दररोज 5 लाख लोकांना थेट रोजगार देते. देशाची आर्थिक स्थिती चांगली नाही आणि आपल्याला गोष्टींकडे लक्ष वळवण्यासाठी आमचा वापर करण्यात येत आहे. आम्हाला सोशल मीडियावर लक्ष्य केले जात आहे. आम्हाला सरकारकडूनही पाठिंबा मिळत नाही. ज्यांनी फक्त चित्रपटसृष्टीच्या मदतीने हे नाव कमावले त्याला गटर असे संबोधले. मी त्यास समर्थन देत नाही.’

या व्यतिरिक्त त्या म्हणाल्या, ‘या इंडस्ट्रीत असे काही लोक आहेत जे सर्वाधिक कर भरतात, परंतु त्यांना त्रासही दिला जात आहे. फिल्म इंडस्ट्रीबद्दल अनेक आश्वासने दिली होती, पण ती कधीच पूर्ण झाली नाहीत. सरकारने करमणूक इंडस्ट्री समर्थनात यावे. मला वाटते सरकारने करमणूक इंडस्ट्रीला मदत केली पाहिजे. काही वाईट लोकांमुळे आपण संपूर्ण इंडस्ट्रीची प्रतिमा खराब करू शकत नाही.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like