Kangana Ranaut On Uddhav Thackeray | शिवसेना गमावल्यानंतर कंगना रणौतची उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाली…

पोलीसनामा ऑनलाईन : Kangana Ranaut On Uddhav Thackeray | केंद्रीय निवडणूक आयोगाच्या एका निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ झाली असून या निर्णयाने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल 17 फेब्रुवारी रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला. तसेच निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आणि शिवसेना हे पक्षाचे नावदेखील शिंदे गटाला दिले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. (Kangana Ranaut On Uddhav Thackeray)

यानंतर सोशल मीडियामध्येही दोन्ही गटातील लोक आपआपल्या नेत्यांना पाठिंबा देताना दिसत आहेत. यामध्ये काहींनी शिंदें सरकारची बाजू घेतली तर काहींनी उद्धव ठाकरेंची बाजू मांडली. अशातच अभिनेत्री कंगना राणावत हिने पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे पण सडकून टीका केली आहे. कंगनाने 2021 मध्ये एक ट्वीट केले होते ज्यात तिने म्हंटल होत की, ‘साधूंची हत्या आणि स्त्रीचा अपमान करणाऱ्याचा विनाश निश्चित आहे’. तिचे हेच ट्वीट एका ट्विटर युजरने रीट्वीट करत लिहिले की, ‘तिने आधीच अंदाज बांधला होता, म्हणूनच ती क्वीन आहे’. कंगनाने याच ट्वीटवर कमेंट करत खालील लेटेस्ट ट्वीट केले आहे. (Kangana Ranaut On Uddhav Thackeray)

Advt.

कंगनाने शेअर केलेल्या ट्वीटमध्ये लिहिले की, ‘वाईट काम केल्यानंतर देवतांच्या राजा इंद्रालादेखील स्वर्गातून खाली
यावं लागलं होत , मग तो तर फक्त एक नेता आहे.
जेव्हा त्याने अन्यायाने माझे घर तोडले, तेव्हाच मी समजून गेले होते की हाही लवकरच पडणार आहे.
चांगले काम करुन देवता पुन्हा वर जाऊ शकतात, पण स्त्रीचा अपमान करणारे लोक कधीच वर उठू शकत नाहीत,
आता तो परत कधीच उठू शकणार नाही’. उद्धव ठाकरेंचं सरकार असताना कंगनाच्या घराचा काही भाग मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाणे पाडला होता.
त्यावेळीदेखील कंगना उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हणाली होती,
“आज माझं घर पाडलं आहे, उद्या तुमचा गर्व मोडून पडेल. प्रत्येकाची वेळ येते…लक्षात असू द्या”.

Web Title :-   Kangana Ranaut On Uddhav Thackeray | uddhav thackeray loses name symbol of shivsena founded by father kangana ranaut on uddhav thackeray shivsena

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shahnawaz Pradhan Passes Away | अभिनेते शाहनवाज प्रधान यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; 56 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Pune Crime News | मालक – चालक यांच्या वादात हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांना ठेवले कोंडून; लोणी स्टेशन येथील घटना