संजय दत्तला भेटायला हॉटेलवर गेली कंगना, फोटो पाहून आपापसात भिडले चाहते ! म्हणाले…

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस कंगना रणौत (Kangana Ranaut) सध्या तिचे आगामी प्रोजेक्ट थलायवी (Thalaivi) च्या शूटिंगमध्ये धाकड (Dhakad) सिनेमाच्या तयारीत व्यस्त आहे. अलीकडेच तिनं अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) सोबतचा फोटो शेअर केला आहे, ज्यामुळं तिला जोरदार ट्रोल केलं जात आहे.

कंगनानं संजय सोबतचा एक फोटो सोशलवर शेअर केला आहे. फोटो सोबत तिने लिहिलं की, जेव्हा मला समजलं की, आम्ही हैदराबादच्या एकाच हॉटेलमध्ये थांबलो आहोत. मी संजू सरांना भेटून त्यांच्या तब्येतीची विचारणा केली. त्यांना आधीपेक्षा हेल्दी आणि हँडसम पाहून आनंद झाला. आम्ही तुमच्या चांगल्या आरोग्याची आणि दीर्घायुष्याची प्रार्थना करतो.

कंगनाची ही पोस्ट समोर आल्यानंतर तिचे फॉलोवर्स आता आपापसात भिडताना दिसत आहेत. काहींनी तिला ट्रोल करत विरोध केला तर काहींनी तिला सपोर्टही केला आहे. लोकांनी यावर कमेंट करत लिहिलं की, चरसचा विरोध करत करत चरसीजवळ बसली ? एकानं लिहिलं की, तो नेपोटीजमचं प्रॉडक्ट आहे. तू तुझ्याच शब्दांविरोधात आहेस. संजूनं जास्त सिनेमे केले आहेत, परंतु तुझ्यासाठी नेपो किडच राहणार आहे.

93 व्या अकॅडमी अवॉर्ड (93rd Academy Awards) मध्ये मल्याळम सिनेमा जलीकट्टू (Jallikattu) ची भारताकडून अधिकृत एन्ट्री झाली आहे. बुधवारी ही एन्ट्री झाल्यानंतर कंगनानं जलीकट्टूला शुभेच्छा देत पुन्हा मूव्ही माफियांवर निशाणा साधला होता.

कंगनानं या संदर्भात ट्विट केलं होतं. कंगना म्हणाली होती की, बॉलिवूडविरोधात जेवढा आवाज उठवला जात होता, जेवढी चौकशी केली जात होती. त्यातून काहीतरी फायदा झाला. भारतीय सिनेमे केवळ फिल्मी कुटुंबासाठी नाहीत. मूव्ही माफिया आता आपल्या घरातच लपून आहेत आणि ज्युरीजला आपलं काम करू देत आहेत. टीम जलीकट्टूला शुभेच्छा.

कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती पंगा सिनेमात दिसली होती. लवकरच ती आगामी सिनेमा थलायवीमध्ये दिसणार आहे. तमिळनाडूच्या राजकारणातील एक मोठं नाव तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या बायोपिकमध्ये जयललिता यांची भूमिका कंगना साकारणार आहे. याशिवाय ती तेजस आणि धाकड या सिनेमातही काम करताना दिसणार आहे.

You might also like