‘लवकरच मुख्यमंत्रीपद जाईल अन् दुसरं कुणीतरी येईल’, कंगनाचं उध्दव ठाकरेंना प्रत्युत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लवकरच उध्दव ठाकरे (uddhav-thackeray) यांचे मुख्यमंत्रीपद जाईल आणि दुसरे कोणीतरी येईल, असे विधान करत अभिनेत्री कंगना राणावतने (kangana-ranaut) मुख्यमंत्री ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात रविवारी पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला चांगलेच फैलावर घेतले होते. तसेच ठाकरे यांनी यावेळी मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करत मुंबई पोलिसांवर टीका करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावतवरही शरसंधान केले होते. ठाकरे यांनी केलेल्या टीकेनंतर कंगना राणावतने त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. लवकचर तुमची मुख्यमंत्रीपदाची खुर्चीही जाईल, असे विधान कंगना राणावतने केले आहे.

You might also like