तब्बल 7 महिन्यानंतर कामावर परतली कंगना रनौत, दक्षिणेत करणार थलायवीची शूटिंग

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   कोरोनाच्या काळात लहान मोठे कलाकार असो किंवा इतर कोणी पण काम करणे हे सर्वांनाच कठीण होते. पण आता हळू हळू सर्व सुरळीत होत आहे. सर्व लोक आपापल्या कामावर परतत आहेत.

अशातच कंगना राणावत देखील चक्क सात महिन्यानंतर कामावर जात आहे. कोरोना काळात जवळपास सात महिने झाले चित्रपटगृह तसेच शुटींग बंद होते आणि आता ते सुरू झाले आहेत. त्यामुळे सर्वच कलाकार कामावर जाताना दिसत आहेत. कंगना सुद्धा आपला दाक्षिणात्य चित्रपट थलाइवी च्या शूटिंग साठी जात आहे. आणि ही माहिती तिने ट्विटर वरून प्रेक्षकांना दिली. कंगना म्हणते की सात महिन्यानंतर मी कामावर जात आहे या कोरोनाच्या भयानक काळात आपले आशीर्वाद माझ्या सोबत असू द्या. मी माझ्या द्विभाषिक चित्रपट थलाइवी साठी दक्षिण भारतात जात आहे. कंगना रानावत या चित्रपटामध्ये जयललिता यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटासाठी कंगना यांनी आपले वजन वाढवले आहे व तिच्या या फोटोवर काही युजर्स ने तिला ट्रोल देखील केले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like