‘चित्रपटासाठी त्यांनी मला अंतर्वस्त्राशिवाय फोटोशूट करायला सांगितले होते’ : कंगना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री कंगना रणौत हीने नुकत्याच एका मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला आहे. सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्याविषयी कंगनाने गौप्यस्फोट केला आहे. त्यांच्या एका चित्रपटातील प्रसंग तिने सांगिला आहे. अंतर्वस्त परिधान न करता त्यांनी मला फोटोशूट करायला सांगतिलं होतं असं तिने सांगितलं आहे.

एका मुलाखतीत बोलताना कंगना म्हणाली की, “मुंबईत आल्यानंतर सुरुवातीच्या काळात मला अनेक वाईट अनुभवांना तोंड द्यावं लागलं होतं. पहलाज निहलानी यांनी मला त्यांच्या एका चित्रपटाची ऑफर दिली होती. ‘आय लव्ह यू बॉय’ असं त्या चित्रपटाचं नाव असून त्यासाठी फोटोशूट होणार होतं. फोटोशूटसाठी मला त्यांनी रोब (पारदर्शक गाऊन) घालायला दिला होता. अंतर्वस्त परिधान न करता फक्त रोबवर त्यांनी मला फोटोशूट करायला सांगितलं होतं. या चित्रपटात मी एका मुलीची भूमिका साकारणार होती, जिच्या मनात तिच्या बॉसविषयी लैंगिक भावना आहेत. ती एक सॉफ्ट पॉर्न भूमिका होती असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. हे सगळं ऐकूनच मी हे काम करू शकत नाही असं सांगितलं आणि तिथून अक्षरश: पळ काढला. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण त्यानंतर मी काही दिवस सगळ्यांपासून लांब राहत होती. मी माझा नंबरदेखील बदलला होता” असंही तिने सांगितलं.

पुढे बोलताना कंगना म्हणाली की, “फोटोशूटच्या या प्रसंगानंतर काही काळाने मला गँगस्टर या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आणि माझ्या करिअरला दिशा मिळाली.”

एका छोट्या गावातून आलेल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातील कंगनाने तिच्या अभिनय कौशल्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपलं स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. आपलं नाव कमावण्यासाठी तिलाही बराच स्ट्रगल करावा लागला होता. बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना तिलाही बऱ्याच प्रसंगांना समोरं जावं लागलं आहे.