कंगना रणौतला ‘जोर का झटका’ ! 6 ब्रॅंड्सनं रद्द केला तिच्यासोबतचा करार

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस कंगना रणौत (Kangana Ranaut) आपल्या बिंधास्त वक्तव्यांसाठी ओळखली जाते. सोशलवर ती कायमच अ‍ॅक्टीव्ह असते. कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर ती भाष्य करतच असते. अनेकदा ती वादातही सापडली आहे. आज पुन्हा एकदा तिनं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना घेऊन ट्विट केलं ज्यामुळं ती चर्चेत आली आहे. इतकंच नाही तर यावर भाष्य करणं तिला महागात पडलं आहे. कारण आंदोलनाविरोधात बोलल्यानं तब्बल 6 ब्रँड्सनं तिच्या सोबत असलेला आपला करार रद्द केला आहे. कंगनानंच याबाबत माहिती दिली आहे.

कंगना रणौत ट्विट करत म्हणाली की, शेतकऱ्यांविरोधात बोलल्यानं 6 ब्रँड्सनं माझ्यासोबतचा करार रद्द केला आहे. मी शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटल्यानं त्यांना मला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनवायचं नाहीये, तसं त्यांनी सांगितलं आहे. मला प्रत्येक भारतीयाला हे सांगायचं आहे की, जे कुणी या आंदोलनाला सपोर्ट करत आहे तेही दहशतवादी आहेत. यात अँटीनॅशनल ब्रँड्सचाही समावेश आहे.

ज्यांनी आंदोलनाला पाठींबा दिला आहे त्यांच्यावरही कंगनानं निशाणा साधला आहे. तिनं लिहिलं की, प्रियंका चोपडा आणि दिलजीत दोसांझ आज संपूर्ण जग आपल्यावर हसत आहे. तुम्हाला हेच हवं होतं ना ? अभिनंदन.

ट्रॅक्टर रॅलीवर व्यक्त केला होता संताप
आज प्रजासत्ताक दिनानिमित्त शेतकऱ्यांकडून रॅली काढण्यात आली होती. ही रॅली रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रु गॅसचा मारा केला. काही ठिकाणी तर लाठी चार्जही केला गेला. शेतकऱ्यांविरोधात घेतल्या गेलेल्या या अ‍ॅक्शनचा अनेक सेलेब्सनं विरोध केला. कंगनानंही शेतकऱ्यांच्या या ट्रॅक्टर रॅलीवरून ट्विट केलं. काही तरी लाज बाळगा असं कंगना तिच्या ट्विटमध्ये म्हणाली आहे. ट्विटमुळं कंगना पुन्हा एकदा चर्चेत आली होती.

कंगना आपल्या ट्विटमध्ये लिहिते की, कळप बनून राहिलेत. आडाणी, गल्लीत कोणाच्या घरी लग्न असो किंवा चांगला सण आला असेल तर जळके ताऊ, काका, काकू कपडे धुणं, किंवा मग लहान मुलांना अंगणात शौचास बसवणं किंवा खाट टाकणं, भर अंगणात दाऊ पिऊन नागडं होणं. हेच हाल झालेत या देशाचे. आज तरी लाज बाळगा. कंगनानं आपल्या ट्विटमध्ये रिपब्लिक डे चा हॅशटॅगही वापरला आहे.

कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती पंगा सिनेमात दिसली होती. लवकरच ती आगामी सिनेमा थलायवी मध्ये दिसणार आहे. तमिळनाडूच्या राजकारणातील एक मोठं नाव तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या बायोपिकमध्ये जयललिता यांची भूमिका कंगना साकारणार आहे. याशिवाय ती तेजस आणि धाकड या सिनेमातही काम करताना दिसणार आहे.