छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणार्‍यांवर अभिनेत्राी कंगना संतापली

पोलिसनामा ऑलनाईन – स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे निर्माण झालेला वाद शांत होण्याची चिन्ह दिसत नाहीत. महापुरुषांचा अपमान करणार्‍या कॉमेडियन्सवर कारवाई करण्यात यावी यामध्ये बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतचीही भर पडली आहे.

टीम कंगना रणौत या ट्विटर हॅण्डलवरुन एका कॉमेडियनने या सर्व प्रकरणावर पोस्ट केलेल्या उपहासात्मक व्हिडिओवर कमेंट करण्यात आली आहे. या उपहासात्मक व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा संदर्भ देत सध्याच्या कॉमेडियन्सवर भाष्य करण्यात आले आहे. यामध्ये कंगणाने ज्यांना दोन पैशाचीही किंमत नाही, ज्यांना कोणी विचारत नाही असे लोक शहीदांची मस्करी करतात. हे योग्य नाही. कोणीही शहीदांची मस्करी करु नये. आपले राष्ट्रीय हिरो आणि थोर व्यक्तींची मस्करी करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी कठोर कायदे हवेत, असे मत व्यक्त केले आहे. कंगनाने लगावलेला हा टोला अप्रत्यक्षपणे अभिनेत्री स्वरा भास्करसाठी असल्याचे बोलले जात आहे.