अभिनेत्री कंगना रणौत कायदेशीर नोटीस पाठवत म्हणाली, ‘२४ तासात बॅन हटवा नाहीतर…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री कंगना रणौत एंटरटेनमेंट जर्नलिस्ट गिल्ड आणि प्रेस क्लब ऑफ इंडियाला एक लीगल नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये तिने म्हटले आहे की, या संस्थांनी पत्रकाराचं समर्थन करत अनैतिक आणि बेकायदेशीर काम केलं आहे. हा पत्रकार अनप्रोफेशनल आणि बेकायदेशीर काम करण्यासाठी बदनाम आहेत. या नोटीसीत तिने अशी मागणी केली आहे की, तिच्यावर लावण्यात आलेलं बॅन हटवण्यात यावं. नाहीतर पत्रकाराला याचे गंभीर परिणाम झेलावे लागतील.

कंगना आणि एका पत्रकाराचं जजमेंटल है क्या या सिनेमाच्या साँग लाँचिंग दरम्यान जोरदार भांडण झालं. या वादानंतर तिने माफी मागण्यासही नकार दिला होता. याशिवाय एका व्हिडीओत तिने असेही म्हटले होते की, पत्रकारांच्या एका ग्रुपने तिला बॅन करावं. तिने हात जोडून यासाठी विनंती केली होती. यानंतर एंटरटेनमेंट जर्नलिस्ट गिल्ड ऑफ इंडियाने कंगनाने माफी मागावी अशी मागणी केली होती. असे न झाल्याने तिला बॅन करण्यात आले होते.

यानंतर जजमेंटल है क्या या सिनेमाची निर्माती एकता कपूरने या प्रकरणी माफी मागितली होती. परंतु कंगनाची बहिण रंगोल चंदेलने ट्विट करत या प्रकरणी स्पष्ट केले होते की, कंगना या प्रकरणी कोणाचीही माफी मागणार नाही. आपल्या ट्विटमध्ये तिने म्हटले होते की, “एका गोष्टीचा शब्द देते, कंगनाकडून माफी मागितली जाणार नाही. या विकाऊ, नागड्या, देशद्रोही, देशाच्या दलाल मीडिया वाल्यांना कंगना धो धो धुवत चांगलीच सरळ करेल. बघा तुम्ही चुकीच्या व्यक्तीकडून माफी मागण्याची मागणी करत आहात.”

या नोटीसीत पत्रकाराच्या फेसबुक पोस्ट्स आणि ट्विटर पोस्ट्सलाही सामिल करण्यात आलं आहे. या पोस्ट्समध्ये तो कंगनावर टीका करताना दिसत आहे. याचाच आधार घेत पत्रकारावर कंगनाची प्रतिमा मलीन करण्याचा आरोप लावला जात आहे. कंगनाचे वकिल रिजवान सिद्दीकी यांनी या नोटीसमध्ये शेवटी लिहिले आहे की, “माझ्या क्लायंटने पत्रकाराविरोधात कठोर पाऊल उचलण्याआधी तुम्ही तिच्यावर लावण्यात आलेलं बॅन हटवा. २४तासांत असे झाले नाही तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागले.

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

स्तनाच्या कर्करोगाची ‘ही’ ६ लक्षणं, जाणवल्यास ‘हे’ ४ उपाय तात्काळ करा, जाणून घ्या

गुलाबाच्या फुलाचे अशाप्रकारे सेवन ‘या’ आजारांसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

‘हे’ उपाय केल्यास ‘गॅस्ट्रिक ट्रबल’मध्ये त्वरित मिळेल आराम, औषध घेण्याची गरज नाही

विज्ञान आणि आयुर्वेद सांगतं ‘या’ पदार्थाने करा जेवणाची सुरूवात, ‘हे’ फायदे होतात