कंगना प्रकरणावर शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले – ’त्यांच्याकडून जिम्मेदारीनं बोलण्याची अपेक्षा नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख शरद पवार यांनी अभिनेत्री कंगना राणावतवर निशाणा साधला आहे. कंगनाबाबत शरद पवार म्हणाले की, तुम्ही त्या व्यक्तीकडून जबाबदार वक्तव्याची अपेक्षा करू शकत नाही. सोबतच शरद पवार यांनी भीमा कोरेगाव आणि मराठा आरक्षणावर सुद्धा आपले म्हणणे मांडले.

कंगना राणावतने म्हटले होते की, ती ज्या बिल्डिंगमध्ये ती राहाते तिचा संबंध शरद पवारांशी आहे. ज्यानंतर शरद पवारांनी म्हटले की, मला माझ्या नावाने बिल्डिंग बनवणे आवडेल. मात्र, जी व्यक्ती बोलत आहे, तुम्ही तिच्याकडून जबाबदार वक्तव्याची अपेक्षा करू शकत नाही.

बीएमसीने 2018 मध्ये खार येथील बिल्डिंगला नोटीस दिली होती. येथे पाचव्या माळ्यावर कंगना राणावतचे घर आहे, ज्यामध्ये तिचे तिन फ्लॅट आहेत. मात्र, हे प्रकरण कोर्टात गेले होते. ज्यानंतर न्यायालयाने अ‍ॅक्शन स्टे दिला होता. मात्र, बीएमसीद्वारे कंगनाच्या ऑफिसवर कारवाई झाली. यानंतर बीएमसीने कंगना जेथे राहात आहे, त्या बिल्डिंगवर अ‍ॅक्शन घेण्यासाठी स्टे हटवण्याची मागणी केली आहे.

भीमा कोरेगाव केस
तर भीमा कोरेगाव प्रकरणावर शरद पवार म्हणाले, प्रत्येक दिवशी नक्षलवादी म्हणून कुणाला तरी अटक केली जात आहे. आम्हाला हे योग्य वाटत नाही आहे. आम्ही प्रकरणाचा आढावा घेतला असून तज्ज्ञांचा सल्ला घेऊ. एनआयएच्या माध्यमातून प्रकरण उचलून धरण्याचा केंद्राला अधिकार आहे. राज्य सरकारकडे सुद्धा अधिकार आहेत. आम्ही यावर विचार करत आहोत की, काय केले पाहिजे.

शरद पवार यांनी म्हटले की, आम्हाला वाटते की प्रकरण योग्य मार्गाने जात नाही. सर्वांना नक्षलवादी समजणे चुकीचे आहे. जर आवश्यकता भासली तर हा विषय आम्ही संसदेत मांडू. तर मराठा आरक्षणाबाबत शरद पवार म्हणाले, मी सीएम उद्धव ठाकरे यांच्याशी मराठा आरक्षणावर चर्चा केलेली नाही. राज्याला लवकरात लवकर मार्ग काढायचा आहे.